शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

आता पाच रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत.

ठळक मुद्देआठही तालुक्यांत राहणार केंद्र : जिल्ह्यात १ हजार नागरिकांची भूक भागविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे. अशा मंडळींना आता सहज जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने आठही तालुक्यात १ एप्रिलपासून शिवभोजन थाळींची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावरुन १ हजार व्यक्तींची पाच रुपयांत भूक भागविली जाणार आहे.सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत. संसर्गातून होणाऱ्या या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. परंतु, या काळात हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यासोबतच बाहेरगावावरून आलेल्यांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने गरिब नागरिकांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळींचे लक्षांक प्रतिदिवशी ४०० वरून १ हजार केला आहे. त्यातील ४०० थाळी अगोदरच वर्धा शहरातील रेल्वे स्टेशन समोर, सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्हा न्यायालयासमोर शिवभोजन केंद्रावर सुरु आहे.आता उर्वरित ६०० थाळींचे विभाजन आठही तालुक्याकरिता करण्यात आले आहे. त्यामध्ये वर्धा (ग्रामीण), सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर या तालुक्यात प्रत्येकी ७५ थाळींची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतचे तालुकास्थळावर आदेश देण्यात आले आहे.आता थाळीऐवजी मिळणार पॅकेट्सशिवभोजन थाळी योजनंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर असल्यामुळे शासन व वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत आहे. परिणामी शासनाने थाळी ऐवजी आता शिवभोजन पॅकेट्स स्वरुपात विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.भोजनालयातही सोशल डिस्टन्सिंगशिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतूक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी जेवण तयार करण्याआधी हात कमीतकमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करुन घेणे, भोजन तयार करणाºया तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेण्याच्याही सूचना केल्या आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय