स्मारकांसाठी शिंदोलीच्या झांज्या सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:07+5:30

आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला होता. आश्रमातील कुटी गरजेनुसार तयार करण्यात आल्या आहेत. आदी निवास, बा व बापू कुटी आणि बापू दप्तर हे सर्व मात्र माती, कुडापासून तयार करण्यात आले आहे.

Shindoli jhanjya safety shield for monuments | स्मारकांसाठी शिंदोलीच्या झांज्या सुरक्षा कवच

स्मारकांसाठी शिंदोलीच्या झांज्या सुरक्षा कवच

Next
ठळक मुद्देस्मारका़प्रमाणे झाडांचे महत्त्वही कायम : पावसाळ्यात भिंतींचे करतात संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : नैसर्गिक वातावरण, स्थानिक साधन साहित्य आणि कारागिरांच्या माध्यमातून आश्रमातील कुटी तयार व्हाव्यात यासाठी गांधींचा विशेष आग्रह राहिला. पावसाळ्यात मातीच्या भिंतीचे संरक्षण करण्यासाठी शिंदोल्यांच्या पान्होळ्यांपासून बनविलेल्या झांज्याचा उपयोग केला जात होता. ८४ वर्षे झाली, आजही आश्रमातील स्मारकांचे पावसाळ्यात संरक्षण करण्याचे काम झांज्याच करीत असल्याने या झाडांचे महत्त्व स्मारकांप्रमाणे सदैव कायम असल्याचे चित्र आहे.
आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला होता. आश्रमातील कुटी गरजेनुसार तयार करण्यात आल्या आहेत. आदी निवास, बा व बापू कुटी आणि बापू दप्तर हे सर्व मात्र माती, कुडापासून तयार करण्यात आले आहे. यात बा-बापू यासह अनेक कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा प्रत्यक्ष संबंध राहिला आहे.
मातीच्या भिंतींना पावसापासून धोका असल्याने त्यांच्या रक्षणासाठी उपलब्ध शिंदोल्यांच्या पान्होळ्यांपासून झांज्या तयार करून लावल्या जात असे. त्याकाळी मोठ्या प्रमाणावर या झाडांचे बन होते. त्यामुळे कधीच तुटवडा जाणवायचा नाही. पावसाळा संपला की त्या व्यवस्थित सुरक्षित ठेवल्या जात असे. तो बापूंचा नियम होता.
चिऱ्यांपासून चटया, आसन, फडे आदी तयार केले जात जात असे. याचा उपयोग आश्रमात तसेच गावातील लोक नित्य करीत होते. बाहेरून आलेल्या व्यक्तींना याच चटयांवर बसावे लागत असे. झोपण्यासाठीसुद्धा याचा उपयोग केला जात होता. आजही आदी निवास, बा व बापू कुटीत चटया दिसून येतात. सर्वत्र याचा उपयोग होत असल्याने स्थानिक कारागिरांना रोजगार यातून मिळाला होता. दोघांच्याही गरजा एकमेकांच्या सहयोगाने पूर्ण होत होत्या. काळ बदलला, झाडे दिसेनाशी झाली. कारागीरही नाहीत. त्यामुळे चिरे करंजी, पवनी, हमदापूर, जुनोना या गावातील शिवारातून खरेदी करावी लागतात. चटयांसाठी रामटेक येथील मधील कारागिरांचा शोध घ्यावा लागतो. यावर्षी जुनोना येथील कामगारांना सांगण्यात आले, मात्र पान्होळ्या मिळाल्या नाही. झाडांची दुर्मिळता यामुळे झांज्या सांभाळून ठेवाव्या लागतात. त्याची जपणूक करावी लागते. आता बांबूच्या बोºयाच्या झापड्याही लावल्या जातात. जगासमोर आश्रम प्रेरणास्थान असून जागतिक संकटकाळ, आधुनिकतेकडे वाटचाल आणि महामारीत बापूंच्या आश्रमातील जीवन पद्धतीचे स्मरण होते, परंपरा आठवायला लागतात. आश्रम राष्ट्रीय धरोवर असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शिंदोल्यांची झाडे सदैव उपयोगी ठरत आहेत.

स्मारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने झांज्या व झापड्या आवश्यक आहेत. पावसापूर्वी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मारकांच्या जपवणुकीला सदैव प्राधान्य दिले जाते.
मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.
 

Web Title: Shindoli jhanjya safety shield for monuments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.