शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेलू (मुरपाड) खून प्रकरणात आणखी सात आरोपीला अटक

By अभिनय खोपडे | Updated: August 11, 2023 20:05 IST

आरोपीची एकूण संख्या अकरा : बुधवार पर्यंत पोलीस कोठडी

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील सेलू (मुरपाड) येथील खून प्रकरणात आणखी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता आरोपीची एकूण संख्या ११ झालेली आहे, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता बुधवार (ता.१६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सेलू (मु.) येथे जमावाद्वारे आकाश उल्हेश उईके( ३२)  या गुन्हे प्रवृत्तीच्या युवकास बुधवारी (ता.९) रात्री १० वाजता चे दरम्यान बेदम मारहाण करण्यात आलेली होती. त्याला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक आकाशने घटनेच्या दिवशी आरोपीची सायकल पाडून भांडण उकरून काढले होते. मृतकाच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी त्याला दगड व लाठीकाठीने मारहाण करीत त्याला जीवाने संपविले होते. याप्रकरणात १० ते १५ आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलिसात खुनाचा गुन्हा दाखलकरण्यात आला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी गजानन खडसे (३८), पांडुरंग देवतळे (४४),प्रकाश खडसे (४४) आणि शरद सातपुते (४४) या चार आरोपीला तात्काळ अटक केली. चौकशीत आणखी आणखी सात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. यात जितेंद्र सुभाषराव गौळकार ( ३३), चंद्रशेखर राजूजी मांडवकर (२५ ), वैभव बबनराव धोटे (२०), धनराज वसंतराव छापेकर ( ३०), अतुल शंकरराव गौळकार ( २८) , गोपाल सोनू पवार (२६) आणि आकाश बंडूजी भांडेकर ( २६ )यांना अटक करण्यात आलेली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी