सेवाग्राम आश्रमाचा ‘आयकॉनिक साइट्स’च्या यादीत होणार समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 09:33 PM2019-09-21T21:33:01+5:302019-09-21T21:33:27+5:30

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला आयकॉनिक साइट्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचनेची नोंद घेतली असून भविष्यातील घडामोडींकरिता मंत्रालयाच्या विचाराधीन राहील, असे पत्र पर्यटन मंत्रालय, भारत सरकारकडून आले आहे.

Sevagram Ashram included in the list of 'iconic sites' | सेवाग्राम आश्रमाचा ‘आयकॉनिक साइट्स’च्या यादीत होणार समावेश

सेवाग्राम आश्रमाचा ‘आयकॉनिक साइट्स’च्या यादीत होणार समावेश

Next
ठळक मुद्देकेंद्रीय पर्यटन मंत्रालयाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला देशाच्या आयकॉनिक स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी १ जुलै २०१९ रोजी पंतप्रधानांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आयकॉनिक साइट्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचनेची नोंद घेतली आहे.
देशातील आयकॉनिक साइट्सची योजना तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे आणि शहरी स्थानिक संस्था यांच्यासमवेत पर्यटन स्थळांकरिता तयार करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीतून इतर ठिकाणी त्याची प्रतिकृती तयार करण्यात येत असते. विकासाची दृष्टी साध्य करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने देशातील १७ स्थळांना आयकॉनिक पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित केले आहे. ज्याच्या अस्तित्वातील पाऊल, प्रादेशिक वितरण, विकासाची संभाव्यता आणि सुलभता यावर आधारित आहे. आयकॉनिक साइट्सचा विकास अंमलबजावणीचे निकष म्हणून देशातील निवडक पर्यटन स्थळे विकसित केली जात आहे. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला आयकॉनिक साइट्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केलेल्या सूचनेची नोंद घेतली असून भविष्यातील घडामोडींकरिता मंत्रालयाच्या विचाराधीन राहील, असे पत्र पर्यटन मंत्रालय, भारत सरकारकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Sevagram Ashram included in the list of 'iconic sites'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.