अवैध अतिक्रमण प्रकरण : मध्यस्थीनंतर उपोषण घेतले मागेहिंगणघाट: शेतजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता पिंपळगाव (मा.) येथील वयोवृद्ध शेतकरी खुशालराव झोरे यांनी शुक्रवार दि. १४ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले हाते. दरम्यान माजी आमदार राजू तिमांडे यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण तूर्त मागे घेण्यात आले.खुशाल झोरे यांची पिंपळगाव शिवारात ०.०५ हेक्टर शेतजमीन असून त्याचा सर्वे नं. ३४२ आहे. ही शेतजमीन वाहतीत नसल्याचा फायदा घेत एका इसमाने तयावर अवैध अतिक्रमण केले. जमीन ताब्यात घेण्याकरिता झोरे यांनी तहसील आणि भूमापन कार्यालयाचे उंबरठे झिजविले परंतु यश आले नाही. त्यानंतर दोन जुलै ला झोरे यांनी बेमुदत उपोषणाची लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. परंतु मुद्दा निकाली निघाला नाही. पर्यायाने झोरे यांनी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी ता. १४ बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनाला भेट देण्याकरिता आलेल्या माजी आमदार राजू तिमांडे यांनी या विषयावर तहसीलदार दीपक करंडे आणि भूमापन अधिकारी झेंडे यांच्याशी चर्चा केली. चर्चे दरम्यान भूमापन अधिकाऱ्यांनी या विवादित जमिनीची मोजणी करून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्याच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: August 15, 2015 02:11 IST