शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ ...

ठळक मुद्देपीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ आहे. शिवाय मागील वर्षी गुलाबी बोंडअळी आणि निसर्गाच्या हलरीपणाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. परंतु, इफको टोकीयो जनरल इंशुरन्स कंपनीने केवळ ७७९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी नाममात्र आर्थिक मोबदला दिला. पीक विम्याची ही पद्धत शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी असून त्यात सुधारणा करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.वर्धा जिल्ह्यातील ५०१ बिगर कर्जदार तर ३४ हजार ५५८ कर्जदार शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विम्याचे कवच घेतले होते. विशेष म्हणजे पीक कर्ज घेणाऱ्यां प्रत्येक शेतकऱ्याला विमा काढणे आवश्यक करण्यात आले होते. मागील वर्षी सदर शेतकºयांची ६.७५ कोटी तर राज्य शासनाचा ६.२९ कोटी व केंद्र सरकारचा ६.२९ कोटींचा निधी या विमा कंपनीकडे वळता झाला.परंतु, सरते शेवटी केवळ ७७९ शेतकऱ्यांना विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरवित त्यांना नाममात्र ४१.१४ लाख रुपये देण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या नावाखाली या विमा कंपनीने शेतकऱ्यांसह केंद्र व राज्य शासनाची फसवणूक केली आहे. शिवाय स्वत:ला लाभ पोहोचून घेतला आहे. त्यामुळे पीक विम्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. सदर निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्विकारले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केले. आंदोलनात महेश आगे, प्रमोद वरभे, कृष्णा गुजरकर, अनिल डफरे, गजानन सावरकर, महादेव धोपटे, विनोद क्षीरसागर, गजानन निवल, प्रविण पाल, अभय देवढे, ज्ञानेश्वर काळे, पुरुषोत्तम देवतळे, अनंत कोपरकर, गणेश तुमसरे, किशोर भोयर, अमोल आत्राम, रामेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.