लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जामणी गावात जाण्याकरिता मुख्य मार्गापासून पोचरस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर केवळ गिट्टी शिल्लक आहे. डांबराचा स्तर निघाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. गत चार वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केली नाही. सदर रस्ता वर्दळीचा असल्याने मजबुतीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.देवळी-पुलगाव मुख्य मार्गापासून १ कि.मी. अतंरावर असलेल्या जामणी गावाला जोडण्याकरिता डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. यानंतर या रस्त्याची कधीच दुरुस्ती केली नाही, अशी तक्रार ग्रामस्थ करतात. त्यामुळे रस्ता क्षतीग्रस्त झाला आहे. रस्त्याची गिट्टी उखडली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने आवागमन कठीण झाले आहे. खड्ड्यातून रस्ता शोधताना वाहन चालकांना त्रास होतो. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो. वाहन चालकांना येथे खड्ड्यांमुळे अपघात झाले आहे. पायी चालणाºयांना त्रास होतो. रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन केली.
जामणी पोचमार्गावर खड्ड्यांची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:50 IST
जामणी गावात जाण्याकरिता मुख्य मार्गापासून पोचरस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर केवळ गिट्टी शिल्लक आहे. डांबराचा स्तर निघाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.
जामणी पोचमार्गावर खड्ड्यांची मालिका
ठळक मुद्देडांबरीकरण उखडले : डागडुजीकडे दुर्लक्ष