शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:54 IST

Wardha : दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे तसेच मेडिकल कौन्सिलकडे लवकरात लवकर पाठविण्यात यावा, या मागणीसाठी मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांच्या नेतृत्वात सुमारे दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.

मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे ४०० खाटा असलेल्या रुग्णालयाच्या दहा किलोमीटर अंतराच्या आत असावे तसेच सलग २० एकर जागा उपलब्ध असावी, असा नियम असल्याचे नमूद करून यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सुयोग्य वाटणाऱ्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट व परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा व भावनिक विषय असून लवकरात लवकर महाविद्यालयाची उभारणी गरजेची असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. महाविद्यालय हे हिंगणघाट परिसरातीलच नव्हे तर चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ लगतच्या ग्रामीण जनतेची सुद्धा गरज भागविणार आहे.

त्यामुळे विविध क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी आदी विविध क्षेत्रातील जवळपास २००० जणांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माजी प्राचार्य राजेंद्र सातपुते, मंगेश चवडे, नवल मानधनिया, रुपेश लाजूरकर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आ. कुणावार.जनता नर्सिंग स्कूल येथे मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी समितीच्या वतीने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सहकार्य करावे, तसेच ४०० कोटींचा निधी शासनाकडून तातडीने मंजूर करून घ्यावा. अशी विनंती करण्यात आली होती. यावर आ. कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय करिता शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांना सांगितले. 

टॅग्स :wardha-acवर्धा