शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांची अर्थकोंडी; चार महिन्यांपासून वेतन नाही, झेडपीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:53 IST

Wardha : प्रयस्त संस्थेकडून नियुक्ती, कंत्राटदार संस्थेकडून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालयाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्रयस्त संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, या सुरक्षा रक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने त्यांची अर्थकोंडी झाली आहे. वारंवार तक्रार करूनही यासंदर्भात गांभीर्याने घेतले जात नसल्याने उपाशीपोटी काम किती दिवस करावे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासक असून सर्वाधिकार अधिकाऱ्यांकडेच आहे. सुरक्षा रक्षकांच्या समस्याही सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे १३ सुरक्षा रक्षक असून, त्यांची नियुक्ती अमरावती येथील कंत्राटदार संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने सुरक्षा रक्षकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण अद्यापही त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही. चार महिन्यांपासून वेतन नसल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. कंत्राटदार कंपनीकडून नेहमीच वेतनासाठी विलंब होत असल्याने 'न्याय मागावा कुणाकडे', अशी परिस्थिती सुरक्षा रक्षकांची झाली आहे.

वेतनातूनही मागतात म्हणे रक्कमयेथील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही त्रयस्त संस्थेच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे त्यांना वेतनही त्याच संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. सुरक्षा रक्षकांच्या खात्यावर १६ हजार रुपये वेतन जमा केल्यानंतर त्यांच्याकडून तीन ते साडेतीन हजार रुपये परत मागविले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे यातील सत्यता काय, याचा शोध घेऊन कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

१६ हजार रुपयेच मिळतात दरमहा वेतन, तेही अनियमितच...सुरक्षा रक्षकांना कंत्राटदार संस्थेकडून दरमहा १६ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. पण, तेही अनियमित असल्याने सुरक्षा रक्षकांची आर्थिक कोंडी होत आहेत.

भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही थकविल्याचा आरोपजिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट अमरावतील येथील प्रबुद्ध सहकारी संस्थेकडे असल्याचे सांगण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून १३ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना अकरा महिन्यांचा ऑर्डर दिला जात असून, हे सुरक्षा रक्षक अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. त्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीचा हप्ता कापल्यानंतर संस्थेनेही तेवढीच रक्कम जमा करणे गरजेचे आहे. पण, संस्थेकडून अद्यापही हप्ता भरला नसल्याचेही सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

...तर काळ्या यादीत टाकणार का?अयस्त कंत्राटदार कंपनीकडून नेहमीच कामगारांच्या वेतनाबाबत विलंब केला जातो. यापूर्वीही जिल्हा परिषदेतील सुरक्षा रक्षकांचे एका कंत्राटदार कंपनीने वेतन थकविले होते. याची तक्रार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी लागलीच कंत्राटदार कंपनीला बोलावून सुरक्षा रक्षकाचे वेतन करून घेत त्याला काळ्या यादीत टाकले होते. आता जर ही कंत्राटार संस्था वेतन करण्यास विलंब करीत असेल, तर काळ्या यादीत टाकणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

"जिल्हा परिषदेतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही अमरावती येथील संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हप्ता आणि वेतन थकविल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेची चर्चा करण्यात आली. त्यांनी भविष्य निर्वाह निधीचा हप्ता जमा केला असून, लवकरच सुरक्षा रक्षकांच्या वेतनाची रक्कमही त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले."- अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

टॅग्स :wardha-pcवर्धाzpजिल्हा परिषद