शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

४,०४० व्यक्तींच्या हातावर शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

बुधवार २५ मार्च रोजी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी शोध मोहीम राबवून पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर आदी कोरोना बाधित जिल्ह्यातून आणि कोरोना बाधित राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या २ हजार ३२७ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यात कोरोनाची कुुुुुुुुुुुठली लक्षणे तर नाही ना याची शहानिशा केली. शिवाय त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला.

ठळक मुद्देघराच्या दर्शनी भागावर चिकटविले सूचना फलक : होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाबाधित राज्य आणि देशातून आलेल्या व्यक्तींना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने सुरूवातीला होम क्वारंटाईन करून त्यांच्यात कोरोनाची काही लक्षणे आढळतात काय याची शहानिशा केली. तर आता कोरोना बाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जिल्हा प्रशासन घेत असून या व्यक्तींच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारल्या जात आहे. शिवाय या व्यक्तींनी होम क्वारंटाईन दरम्यान काय दक्षता घ्यावी याचीही माहिती दिली जात आहे. मागील तीन दिवसात ४,०४० व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे.बुधवार २५ मार्च रोजी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी शोध मोहीम राबवून पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर आदी कोरोना बाधित जिल्ह्यातून आणि कोरोना बाधित राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या २ हजार ३२७ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यात कोरोनाची कुुुुुुुुुुुठली लक्षणे तर नाही ना याची शहानिशा केली. शिवाय त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. तर गुरूवारी याच चमूने पुन्हा नव्या जोमानो जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. गुरूवारी कोरोना बाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची संख्या ३ हजार २६३ वर पोहोचली. तर शुकवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान आणखी काही व्यक्ती आढळून आले आहे. आता शुक्रवारी ही सख्या ४ हजार ४० इतकी झाली असून या संपूर्ण व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. शिवाय होम क्वारंटाईन दरम्यान त्यांनी पुढील १४ दिवस कुटुंबातील इतर व्यक्तींपासून कसे वेगळे राहवे. शिवाय प्रकृतीत काही बिघाड आल्यास कुणाला माहिती द्यावी याचीही माहिती त्यांना देण्यात आली आहे.घरी बसल्या देता येईल माहितीकोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून कुणी व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आला असेल तर त्या व्यक्तीने स्वत:ची माहीती तातडीने कोरोनाशी लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने एक वेब पोर्टल तयार करून त्याची लिंक व्हायरल केली आहे. या लिंकवर जाऊन आपली आवश्यक माहिती जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तीला आता घरी बसल्यास जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना देता येणार आहे.गृह विलगीकरणातील व्यक्तीने काय करावे?गृहविलगीकरणातील व्यक्तीने अल्कोहोलयुक्त सॅनीटायझर किंवा साबण? आणि पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवावे. स्वत:चे वापरलेले ताट, पाण्याचा ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी इत्यादी दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये.पूर्णवेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर सहा ते आठ तासाने बदलावे. वापरलेल्या मास्कचा कुळेही स्पर्श न होऊ देता जाळून योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करु नये. अशा व्यक्तीने आणि सुश्रृषा करणाऱ्या व्यक्तीने वापरलेले मास्क निर्जतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावावी.वापरलेला मास्क हा जंतू संसर्गयुक्त असतो. अशा व्यक्तीनी खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, अशी लक्षणे आढळल्यास शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तीने १४ दिवस खोलीच्या बाहेर पडू नये, घरातील वृद्ध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. तसेच सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य