शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशातून पडलेल्या वस्तू शास्त्रज्ञांनी घेतल्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अवकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. २ एप्रिल रोजी लाखो लोकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना बघितले होते. यातून वस्तू स्वरुपात समुद्रपूर तालुक्यातील दोन गावे आणि हिंगणघाट तालुक्यातील दोन गावांत धातूची रिंग आणि काही सिलिंडरसारखे दिसणारे गोळे सापडले होते. नागरिकांत दहशत पसरली असतानाच जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतर इस्त्रोचे पथक सहा दिवसांनंतर जिल्ह्यात दाखल झाले.२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अवकाशात आगीचे लोळ उठल्याचे नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. हे दृश्य पाहून नागरिकांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली होती. अनेक तर्क वितर्क नागरिकांकडून लावले गेले. अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. पाहता पाहता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दुसऱ्या दिवशी अवकाशातून पडलेल्या काही वस्तू समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर काही वस्तू गिरड तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पडल्याचे समजले. पोलिसांनी अवकाशातून पडलेल्या वस्तू ताब्यात घेत इस्त्रोशी पत्रव्यवहार केला. इस्त्रोचे शास्त्रज्ञ शाहजहान एन. आणि मयुरेश शेट्टी ही दोन शास्त्रज्ञांची चमू समुद्रपूर येथे ८ रोजी रात्री दाखल झाली. त्यांनी २ सिलिंडरसारखी वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतली. तर शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गिरड पोलीस ठाणे गाठून २ गोळे ताब्यात घेतले. तर हिंगणघाट पोलिसांकडून अवकाशातून पडलेले धातूच्या रिंगचे पत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही शास्त्रज्ञांनी संपूर्ण वस्तूंची पाहणी केली. इस्त्रोच्या वाहनातून यासर्व वस्तू तपासणीसाठी नेल्या जाणार आहेत. त्याचे परीक्षण केल्यानंतर या वस्तूबाबत नेमका अहवाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

जिल्ह्यात आढळलेल्या वस्तूंची होणार तपासणी-    २ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना पाहिले. दुसऱ्या दिवशी समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव परिसरातील शेतात अवकाशातून पडलेल्या २ सिलिंडरसारख्या वस्तू मिळून आल्या. तसेच गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणगाव गाठे परिसरात २ सिलिंडरच्या आकाराचे गोळे आढळून आले. तसेच हिंगणघाट तालुक्यातील भोईपुरा आणि आजंती शिवारात धातूच्या रिंगचे काही तुकडे पडलेले आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू ताब्यात घेत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या ताब्यात तपासणीसाठी दिल्या. आता या गोळ्यांसह तुकड्यांची तपासणी झाल्यावरच सत्य समोर येईल. त्या तथ्यांशाकडे वर्धेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस