शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

परिसरात बिबट्याची दहशत

By admin | Updated: March 23, 2017 00:44 IST

गोठ्यात बांधलेल्या ६ बकऱ्यांच्या गळ्याला चावा घेतला तर त्याचवेळी कुत्र्याचा गळाही या बिबट्याने पकडला.

घोराड/बोरधरण : गोठ्यात बांधलेल्या ६ बकऱ्यांच्या गळ्याला चावा घेतला तर त्याचवेळी कुत्र्याचा गळाही या बिबट्याने पकडला. यात ४ बकऱ्या खुट्यांला बांधून असतानाच मृत्यूमुखी पडल्या. यामुळे शेतकऱ्याचे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्याने सकाळी सेलू येथील वनविभागाच्या कार्यालयाला माहिती दिली. क्षेत्रसहायक एस.टी. लटपटे, पशुवैद्यकीय अधिकारी मून यांनी सकाळी १०.३० वाजता घटनास्थळ गाठून पंचनामा केला. डॉ. मून यांनी जखमी बकऱ्या व कुत्र्यावर उपचार केले. सदर बकऱ्या बिबट्याच्या हल्ल्यातच ठार झाल्याचे क्षेत्रसहायक लटपटे यांनी सांगितले. नुकसानीचा मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्याने वनविभागाकडे केली आहे. गावालगतच बिबट्याचा मुक्तसंचार पाहता शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एक वर्षापूर्वी गावापासून एक किती अंतरावर खापरी रस्त्यावर तरसाचा मृत्यू झाला होता. यामुळे या शिवारात वाघाची दहशत आहे. बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील जुनवानी शिवारात गोठ्यात बांधून असलेल्या गोऱ्ह्यावर बिबट्याने हल्ला केला. यात गोऱ्हा ठार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. हिंगणी परिसरात २४ तासांत ही दुसरी घटना असल्याने शेतकरी, शेतमजूर भयभित आहे. पहिली घटना सोनेगाव शिवारात रविवारी घडली. जुनवाणी शिवारात बाबाराव मुडे यांच्या शेतातील गोठ्यावर बिबट्याने हल्ला करीत गोऱ्हा ठार केला. गोऱ्ह्याला गोठ्याबाहेर फरफटत आणले. त्याच्या पोटाचा भाग फोडलेल्या अवस्थेत होता. गोठ्यात १५ ते २० जनावरे बांधून होती. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अन्य गुरांनी भयभित होऊन दावणी तोडत पळ काढला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मंगळवारी सकाळी बाबाराव शेतात गेले असता हा प्रकार उघड झाला. त्यानी त्वरित हिंगणी वनविभागाला माहिती दिली. क्षेत्रसहायक गणेश कावळे, वनरक्षक सुनील कोटजावरे, तुपे, डॉ. भोयर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला गोऱ्हा गावराणी जातीचा असून शेतकऱ्याचे यात ३० हजारांचे नुकसान झाले. या घटनांमुळे सर्वत्र दहशत पसरली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)