शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शहरातील डॉक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह

By admin | Updated: November 18, 2016 02:19 IST

जनतेच्या हिताकरिता नॅशनल मेडिकल कमिशन रद्द करावे, यासह तेरा मागण्यांच्या पुर्ततेकरिता इंडियन मेडिकल

निवेदन : अन्यायकारक अटी रद्द करण्याची मागणी, विद्यार्थ्यांचाही सहभागवर्धा : जनतेच्या हिताकरिता नॅशनल मेडिकल कमिशन रद्द करावे, यासह तेरा मागण्यांच्या पुर्ततेकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या डॉक्टरांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.नॅशनल मेडिकल कमिशनच्या अटींमुळे वैद्यकीय शिक्षण महाग झाले. परिणामी सर्वच वैद्यकीय सेवा महागड्या होऊन रूग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला. कमिटीने केलेल्या शिफारशी अन्यायकारक असल्याने त्या रद्द करा, वैद्यकीय व्यावसायिकांची स्वायत्तता अबाधित ठेवून एमसीआयमध्ये योग्य ते बदल करा, आरोग्य सेवा अधिकाधिक महाग होणार नाही, यासाठी डॉक्टरांचे लहान हॉस्पिटल्स व फॅमिली डॉक्टर्सना ‘क्लिनिकल एस्टॅब्लीशमेंट अ‍ॅक्ट’ मधून वगळा, पीसीपीएनडीटी कायद्यात बदल करण्यासोबतच गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्यांकरिता गंभीर शिक्षेची तरतूद करा, कागदोपत्री त्रुट्यांना गुन्ह्या गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा करावी, डॉक्टर्स तसेच हॉस्पिटल्ससाठी केंद्रीय सुरक्षा कायदा करा, क्रॉसपॅथी रद्द करा, ज्यांचे जे शिक्षण असेल त्याप्रमाणेच व्यवसाय करण्याची परवानगी द्या, वैद्यकीय निष्काळजीपणावर देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईला योग्य मर्यादा ठेवा, डॉक्टर्स हे रूग्णांच्या उत्पन्नाप्रमाणे शुल्क आकारत नसल्याने रूग्णाच्या उत्पन्नाप्रमाणे नुकसानभरपाई ठरविण्याची अट रद्द करा, यासह आदी मागण्या निवेदनातून केल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मडावी यांना देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत स्कूटर रॅली काढण्यात आली. तसेच सत्याग्रह आंदोलन केले.यावेळी आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. शंतनू चव्हाण यांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध केला. या आंदोलनात डॉ. अरूण पावडे, डॉ. सचिन पावडे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. राजेंद्र बोरकर यांच्यासह ६० डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.(स्थानिक प्रतिनिधी)