जनार्दन देवतळे : स्वाध्याय मंदिरात अभ्यास वर्गवर्धा: महत्मा ज्योतीबा फुले यांनी जे सत्यशोधकीय विचार समाजाला सांगितले. ते सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. ते विचार अधिक प्रखरपणे समाजामध्ये रूजविण्याची गरज आहे, असे विचार प्राचार्य जनार्दन देवतळे यांनी व्यक्त केले.स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित अभ्यास वर्गात ‘महात्मा ज्योतिबा फुले व सत्यशोधक चळवळ’ या विषयावर ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की महात्मा फुले हे उत्कृष्ट लेखक, कवी, नाटककार, स्थापत्यशास्त्रज्ञ होते; परंतु बहुजनांना त्यांचे श्रेष्ठत्व ओळखता आले नाही. त्यामुळे महात्मा फुलेंच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार जाविणपूर्वक होणे गरजेचे आहे. यावेळी मंचावर अनेकांत स्वाध्याय मंदिरचे सचिव अरूण चवडे, अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, प्रा. नूतन माळवी आणि डॉ. सिद्धार्थ बुटले यांची उपस्थिती होती. प्रारंभी महा. अंनिसच्या कार्याचा आढावा व पाहुण्यांचा परिचय प्रकाश कांबळे यांनी दिली. संचालन सुनील ढाले यांनी केले व आभार संजय भगत यांनी मानले. आयोजनासाठी अजय मोहोड, भीमसेन गोटे, भरत कोकावार, डॉ. माधुरी झाडे, कपिल गोडघाटे यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
सत्यशोधक विचार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ
By admin | Updated: September 30, 2016 02:31 IST