शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

भाजप वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय गाते; ओबीसी चेहरा कायम : ‘लोकमत’चे भाकीत ठरले अचूक

By रवींद्र चांदेकर | Updated: May 31, 2025 17:40 IST

मोहरा’ बदलला, रणनीती टिकली : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी भाजपचा नवसंघटना फॉर्म्युला

वर्धा : भारतीय जनता पक्षाने अखेर शनिवारी जिल्हाध्यक्षपदाची माळ पुलगावचे संजय गजानन गाते यांच्या गळ्यात टाकली. जिल्हाध्यक्षपदावर ओबीसी चेहरा कायम ठेवला असला, तरी ‘मोहरा’ मात्र बदलला आहे.

भाजपने यापूर्वी राज्यातील काही जिल्हाध्यक्षांची घोषणा केली होती. मात्र, त्यात जिल्ह्याचा समावेश नव्हता. नंतर ७ मे राेजी मुंबईत कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीतही कुणाच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. अखेर शनिवारी उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर झाली. त्यात जिल्हाध्यक्षपदी संजय गाते यांची वर्णी लागली. भाजपने पुन्हा ‘ओबीसी’ चेहरा कायम ठेवला असला तरी ‘मोहरा’ बदलून पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखली आहे.

जिल्ह्यात खासदार वगळता भाजपकडे एक विधानपरिषद आणि चार विधानसभा सदस्य आहेत. संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत आहे. यापूर्वी ओबीसी प्रवर्गातील सुनील गफाट यांच्या रूपाने भाजपने बहुसंख्य कुणबी समाजाला जिल्हाध्यक्षपद दिले होते. आता भाजपने सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या संजय गाते यांच्या रूपाने कुंभार समाजातील व्यक्तीला जिल्हाध्यक्षपद बहाल केले आहे.

कोण आहेत संजय गाते?

संजय गाते सध्या भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ते बालपणापासून अर्थात १९८७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. १९८९ ते ९२ पर्यंत ते पुलगावच्या समर्थ सायम शाखेत गटनायक ते मुख्य शिक्षक होते. १९९३ ते २००० पर्यंत ते अभाविपचे नगर संघटक, जिल्हा संघटक, विदर्भ प्रांत सहमंत्री होते. २००० ते २००७ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेलू तालुका सहकार्यवाह, पुलगाव कार्यवाह होते. २००७ ते १३ पर्यंत ते भाजपचे देवळी तालुका सरचिटणीस आणि २००९ ते १२ पर्यंत महाराष्ट्र कुंभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते. २०१२ ते १४ पर्यंत महाराष्ट्र कुंभार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष होते. 

२०१३ पासून जिल्हास्तरावर विविध पदेसंजय गाते २०१३ मध्ये प्रथम भाजपचे जिल्हा चिटणीस झाले. ते २०१६ पर्यंत या पदावर होते. त्याच काळात २०११ ते १६ पर्यंत ते पुलगावचे नगरसेवक होते. २०१४ ते २० पर्यंत ते महाराष्ट्र कुंभार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष होते. दरम्यान, डिसेंबर २०१६ मध्ये भाजपने त्यांच्या खांद्यावर ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी टाकली. नंतर २०२३ मध्ये त्यांना बढती देत थेट ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष केले.

‘लोकमत’चे भाकीत ठरले खरे

भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस सुरू होती. अनेक नावे चर्चेत होती. मात्र, जिल्हाध्यक्षपदावर देवळी विधानसभा मतदारसंघातील व्यक्तीचीच निवड होईल, असे भाकीत ‘लाेकमत’ने वर्तविले होते. संजय गाते देवळी विधानसभा मतदारसंघातील पुलगाव येथील रहिवासी आहे. त्यामुळे ‘लोकमत’च्या भाकीतावर शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :BJPभाजपाwardha-acवर्धाZP Electionजिल्हा परिषद