शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सॅनिटाईझ केलेल्या तहसील कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:36 PM

Wardha News Fire तहसील कार्यालयाला सॅनिटायझर केल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये काहीही नुकसान झाले नाही.

ठळक मुद्देतहसीलदारासह कर्मचारी कार्यालयाबाहेर आल्यामुळे दुर्घटना टळलीसॅनिटायझ केल्यामुळे आग लागली

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तीन दिवसापूर्वी आष्टी (शहीद) तहसील कार्यालयात एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाला होता. त्यामुळे तीन दिवस तहसील कार्यालयाचे काम बंद होते. आज तहसील कार्यालय उघडताच तहसीलदार आशिष वानखडे यांनी काही कर्मचारी व तलाठी यांची मिटिंग आयोजित केली होती. अचानक यावेळी इलेक्ट्रिक ची बटन दाबताच शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. आगीचे लोळ पूर्ण कार्यालयात पसरल्यामुळे सर्व वातावरण भयभीत झाले होते. लागलीस तहसीलदार, सर्व कर्मचारी, तलाठी कार्यालयाच्या बाहेर आले. त्यांनी तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या आग प्रतिबंधक गॅस च्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आणि सुटकेचा निश्वास टाकला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.आष्टी तहसील कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे चालू असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र कोरोनामुळे तीन दिवस कामाला बाधा आल्याने आज अचानक गर्दी उसळली. त्यातच आज सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाचे सॅनीटायझर करून देण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व कार्यालय स्वच्छ करण्यात आले. मात्र इलेक्ट्रिकच्या बोर्डाजवळ सॅनिटायझरचे औषध जास्त प्रमाणात लागल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. आगीचे लोळ उठतात एकच गोंधळ उडाला. तहसीलदार आशिष वानखडे, नायब तहसीलदार रणजित देशमुख, कांबळे, मंडळ अधिकारी ओमप्रकाश बाळसकर सर्व तलाठी कर्मचारी तात्काळ कार्यालयाच्या बाहेर आले.तहसील कार्यालयामध्ये एकूण पाच अग्निशामक गॅसचे यंत्र उपलब्ध होते. या पाचही यंत्राच्या साह्याने तहसीलदाराच्या केबिनला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीची घटना आष्टीत वा?्यासारखी पसरली. नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. ठाणेदार जितेंद्र चांदे, मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी प्रशासनाच्या वतीने मदत करण्यासाठी पावले उचलली. मात्र तहसीलदार वानखडे यांनी समय सूचकता बाळगून कार्यालयातील कर्मचारी यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्यामुळे शासकीय रेकॉर्ड सुरक्षित राहिला व जीवित हानी टळली. त्यामुळे तहसील कार्यालयात आग लागली. असा प्रकार सॅनिटायझर मुळे कुठेही होऊ शकतो, म्हणून सावधानता बाळगण्याचे आवाहन तहसीलदार आशिष वानखडे यांनी सर्व कार्यालयांना सुद्धा केले आहे.तहसील कार्यालयाला सॅनिटायझर केल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये काहीही नुकसान झाले नाही. शासकीय रेकॉर्ड परिपूर्ण सुरक्षित आहे. आम्ही सर्व तात्काळ कार्यालयाबाहेर निघाल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने अग्निशमक गॅस ची व्यवस्था करून ठेवल्यामुळे आज मोठी दुर्घटना टळली.आशिष वानखडे,तहसीलदार, आष्टी (शहीद).

टॅग्स :fireआग