शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अर्जदारांचे होणार चावडी वाचन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:50 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी  प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे  वाचन करण्यात येणार आहे.

वर्धा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी  प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे  वाचन करण्यात येणार आहे. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयातील पात्र- अपात्रतेच्या निकषांप्रमाणे  अर्जदार शेतक-यांची  प्राथमिक पडताळणी आणि नागरिकांचे आक्षेप यावेळी नोंदविण्यात येणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबाजावणीसाठी तालुका व उपविभागीय स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तालुका स्तरीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना  तालुक्यातील गावे वाटून देण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन अर्ज  सादर केलेल्या अर्जदाराच्या याद्या पोर्टलवरून काढून त्याचे ठराविक दिवशी  गावात वाचन  करतील. अर्जदाराच्या पात्रतेसंबधीची शहानिशा चावडी वाचन सभेच्या माध्यमातून करण्यात येईल. यातून पुढे आलेल्या माहितीवरून अर्जदाराच्या पात्र- अपात्रतेबद्दलचे शेरे नोंदविण्यात येतील.    पती पत्नी व  त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये या कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे एका कुटुंबातुन एकच अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास अशा अर्जदाराच्या अर्जात यथावकाश आवश्यक ती दुरुस्ती करून त्यांच्या अर्जाचा पुनर्विचार करण्यात येईल. 

  या योजनेंतर्गत विहित पद्धतीप्रमाणे प्राप्त अर्जाची आणि बँकांकडून कर्जासंबंधी प्राप्त माहितीची शहानिशा करण्यात येईल. प्राप्त माहितीच्या आधारे अर्जदाराचे अर्ज मंजूर किंवा  नामंजूर करणे याचा निर्णय तालुकास्तरीय समिती मार्फत घेण्यात येईल. बँकेकडील कर्जासंबंधी माहितीचे व अर्जदाराच्या अर्जाचे ऑनलाईन पद्धतीने मुल्यमापन करून लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. यात तात्पुरते पात्र अर्जदार, अतिरिक्त माहितीसाठी प्रलंबित अर्जदार , तात्पुरते अपात्र अर्जदारआणि  विचाराधीन अर्जदार यादी अशा स्वरूपात चार याद्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील. पोर्टलवरील याद्याना विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन तीन दिवसात जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त माहितीशी सांगड घालून पुन्हा चार वर्गीकरणनिहाय याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. तालुकास्तरीय समितीने पात्र किंवा अपात्र ठरविलेल्या अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर sms द्वारे कळविण्यात येईल.  तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरविल्यानंतर उपविभागीय समितीपुढे अर्जदाराला लिखित अर्जाद्वारे किंवा ऑनलाईन दाद मागता येणार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी