शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींतून साकारणार सखी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:48 IST

आपण तयार केलेल्या उत्पादनाला जोपर्यंत बाजारपेठ उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनस्तरावर प्रयत्न होत आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

ऑनलाईन लोकमतदेवळी : आपण तयार केलेल्या उत्पादनाला जोपर्यंत बाजारपेठ उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. युवक, युवती व महिलांनी यासाठी कसोटी पणाला लावून अधिकाधिक स्वयंरोजगार उभा करावा, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. येत्या एक महिन्याच्या कालावधीत देवळीत दोन कोटींच्या खर्चातून सखी सेंटर विकसित करून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची हमी त्यांनी दिली.जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, पं.स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर व गटनेता शोभा तडस यांची उपस्थिती होती.खा. तडस यांनी पुढे बोलताना म्हणाले, देशाची महिला सक्षम होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व विकसीत केले जात आहे. चीनच्या तुलनेत आपल्या देशाची बाजारपेठ उभी राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील देवळी व वर्धा येथे १२०० घरांची उभारणी होत आहे. या सर्व योजना कार्यान्वित होत असताना जि.प. व न.प.च्यावतीने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.उद्घाटक म्हणून बोलताना जि.प. सभापती भिसे यांनी महिलांच्या शैक्षणिक बाबींवर भर दिला. घरातील एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंबासाठी मार्गदर्शन ठरत असल्याने मुलींच्या शिक्षणाला व्यापक स्थान देणे गरजेचे आहे. रोजच्या आर्थिक नियोजनासोबतच स्वयंरोजगाराच्या संधीमुळे महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जि.प. शिक्षण सभापती गफाट, पं.स. सभापती भुजाडे, उपसभापती गव्हाळकर, हभप दिगांबर गाडगे महाराज व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भाषणे झाली.ग्रामीण विकास यंत्रणेचे समन्वयक देवकुमार कांबळे व इतरांनी शासनाच्या अनेक योजनांची माहिती देऊन महिलांच्या सामाजिक उत्थानासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी तालुक्यातील महिला बचत गटाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तूच्या स्टॉलचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक पं.स. बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री साळवे यांनी केले. संचालन पल्लवी तिवरे व डफरे यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य सुनिता राऊत व मयुरी मसराम, हिंगणघाट पं.स. सभापती कोल्हे, पं.स.गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, भाजपाचे अशोक कलोडे, दशरथ भुजाडे, पं.स. सदस्य स्वप्नील खडसे, युवराज खडतकर, दुर्गा मडावी, आरती इंगोले तसेच न.प. सदस्य सारीका लाकडे व तालुक्यातील महिलांची होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस