शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया विद्यार्थिनीचा पाठलाग केला.

ठळक मुद्देबॅचलर रोडवरील प्रकार : पोलिसांची गस्त नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिकवणीला जाणाºया विद्यार्थिनींचा पाठलाग करीत छेड काढणे, असभ्य वर्तन करणे आदी प्रकार शहरातील बॅचलर रोडवर सर्रास घडत आहेत. पोलिसांकडून गस्त घालणे बंद झाल्याने टवाळखोरांचे फावत आहे. शहर पोलिसांनी टवाळखोर, रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया विद्यार्थिनीचा पाठलाग केला. मात्र, याच दरम्यान एका जागरूक व्यक्तीनेही या युवकांचा पाठलाग केल्याने हे तरुण दुचाकी घेऊन पसार झाले. या व्यक्तीने या काळया रंगाच्या सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकीचा एमएच ३२ एजी ३३३६ असा क्रमांक नोंदविला. दूरध्वनीवरून लोकमतकडे हा क्रमांक देत तक्रारही नोंदविली. बॅचलर रोडवर हे प्रकार नित्याचेच असल्याचे मतही या व्यक्तीने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर नोंदविले.बॅचलर रोडलगत शिकवणी वर्गांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते. शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळेत रोडरोमिओ वर्गाबाहेर उभे असतात.वर्ग सुटताच तरुणींचा घरापर्यंत पाठलाग करतात. पूर्वी शहरात चार्ली पथकांकडून दुचाकीद्वारे गस्त घातली जात होती. त्यामुळे टवाळखोरांवर वचक होता. ही गस्तच पोलीस विभागाने बंद केल्याने छेडखानीचे प्रकार वाढले आहेत.राज्यातील आणि शेजारच्या जिल्ह्यातील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता बॅचलर रोडवर पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकांद्वारे पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे.अडचण असल्यास करा संपर्करात्री वाहतुकीमध्ये अडचण अथवा कोणतीही समस्या असेल किंवा सुरक्षित वाटत नसेल तर आठवड्यातील २४ तास ८००७०१५१५५ या भ्रमणध्वनीवर संपर्क कधीही संपर्क करा अथवा संदेश पाठवावा, असे आवाहन नगरसेवक वरुण पाठक यांनी केले आहे. याशिवाय वुमेन अ‍ॅण्ड चाईल्ड फाऊंडेशनतर्फे महिला आणि मुलींच्या सुरक्षेकरिता रामनगर, वर्धा, सेवाग्राम येथील ठाणेदारांच्या उपस्थितीत ८००७४१२१८५ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत महिला आणि मुलींना तत्काळ मदत देण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेतन वैद्य यांनी कळविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी