शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

बोरधरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:14 IST

निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जीव धोक्यात टाकून लुटतात पोहण्याचा आनंद

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/घोराड : निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात येतात. इतकेच नव्हे तर काही हौसी धरणाच्या पाण्याच्या काठापर्यंत जावून डबा पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. शिवाय ते चिमुकल्यांना सोबत घेवून धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे बोरधरण सध्या जलतरण तलाव झाल्याचे दिसते. तेथे दर्शनी भागावर पोलीस विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, त्या सुचनांकडे सध्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळावा यासाठी बोर प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांनी तसेच सेलू पोलिसांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.पाण्यात उतरुण घेतला जातोय सेल्फीवर्धा पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या मुख्य भागावर छायाचित्र काढण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मोबाईलचा फ्लॅश धरणावर पाडून बोरधाचे चित्र मोबाईलमध्ये कैद केले जात आहे. इतकेच नव्हे तर चक्क धरणाच्या पाण्यात उतरुण सेल्फी काढली जात असल्याने धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.प्लास्टिक बंदीचा फज्जाकमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. असे असले तरी सध्या बोरधरण परिसरात विकल्या जाणाऱ्या वस्तूसाठी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा प्रकार दिसून येतो. तेथे प्लास्टिकच्या पत्रावळीचा वापर होत असून उपयोग झाल्यानंतर त्या नागरिक अस्ताव्यस्त फेकुन देत असल्याने प्लास्टिक बंदीचा येथे फज्जाच उडल्याचे दिसून येते. योग्य कार्यवाहीची गरज आहे.दारुच्या बाटल्यांचा खचजिल्ह्यात दारूबंदी असली तरी काही मद्यपी या परिसरात चोर वाटेने दारू आणून तेथे दारूपार्टीच करीत असल्याचे दिसून येते. पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांसह दारूच्या रिकाम्या शिश्यांचा खच धरण परिसरात दिसून येतो. या परिसराची नैसर्गिक सुंदरता कायम रहावी तसेच मद्य पार्टीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.२४ तास सुरक्षा रक्षक देण्याची मागणीविस्तीर्ण असलेल्या परिसरात धरणाच्या किनाऱ्यावरून पर्यटक फेरफटका मारतात; पण पाण्याच्या काठावर जावून बसणाऱ्यांची संख्या कमी नाही. येथे येणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांना सुद्धा सुरक्षिततेची आवश्यकता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी बोरधरण परिसरात २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरणPlastic banप्लॅस्टिक बंदी