शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

घरकुलासाठी ग्रामीण जनतेला अडीच लाख मिळाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:56 IST

शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक गरजुंना मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सदर योजनेसाठी मिळणारा दीड लाखांचा निधी वाढवून तो शहराप्रमाणे अडीच लाख झाला पाहिजे.

ठळक मुद्देरामदास तडस : खासदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक गरजुंना मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सदर योजनेसाठी मिळणारा दीड लाखांचा निधी वाढवून तो शहराप्रमाणे अडीच लाख झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक ग्रा. पं. ने ठराव घेवून मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.पं. स. सभागृहात तालुकास्तरीय आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर पं. स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, गट विकास अधिकारी मनोहर बारापात्रे, जि.प. सदस्य मयुरी मसराम, पं. स. सदस्य दिलीप अग्रवाल, शंकर उईके, युवराज खडतकर, कुसुम चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या आढावा बैठकीला तालुक्यातील विविध गावांमधील सरपंच, ग्रामसेवक तसेच विविध विभागाच्या अधिकाºयांची उपस्थिती होती.लोकहितासाठी घरकुलाची योजना कार्यान्वित होत असताना काही अधिकारी या कामात कुचराई करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा अधिकाºयांना वेळीच वटणीवर आणणे गरजेचे असल्याने अशांच्या नावांची यादी माझ्याकडे आहे. कामचुकारी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही यावेळी खा. तडस म्हणत समस्यांची दखल घेवून संबंधितांना कामाबाबत निर्देश दिले.प्रत्येक गावात घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती व मशीनच्या माध्यमातून कचऱ्याचे विलगीकरण करण्याबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली. गिरोली वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामातील निष्काळजीपणा व अरेरावीचा ठपका ठेवून तसेच गर्भवती मातावर याचा विपरीत परिणाम व मुल दगावण्याचा गंभीर आरोप करण्यात आला.गावपातळीवर शासनाच्या योजनांची माहिती दिली जात नसल्याने अनेक जण योजनांपासून अनभिज्ञ आहे, अशी टिप्पणी यावेळी मांडली असता खा. तडस यांनी त्यावर प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्याच्या सूचना केल्या. देवळी तालुक्यातील बहूतांश ग्रामपंचायतींनी दिव्यांगाच्या वाट्याचा असलेला निधी खर्च केलेला नाही. असे पुढे येताच दिव्यांगांच्या समस्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देत सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी शासकीय जागेवर वसलेल्या नागरिकांना पट्टे देण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. ईसापूर येथे गोट मार्केट उभारून शेळी पालनाच्या व्यवसायाला चालना देण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी कामे व येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा झाली. शिवाय पांदण रस्ते, नदी- नाले खोलीकरण तसेच बंद झालेले रस्ते, उज्ज्वला योजनेबाबतच्या तक्रारी, विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, विविध शाळांमधील सूविधा, तसेच शिक्षकांची कमतरता, नाचणगाव येथील ग्रामविकास अधिकाºयांचा विषयही चर्चीला गेला. याप्रसंगी राजू शेंडे, डॉ. प्रवीण धमाने, सालम सईद, प्रमोद सातपुडे, मेश्राम, दशरथ भुजाडे, सतीश आत्राम, संजय खोपडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस