शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्याविना ग्रामीण रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:23 IST

सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे.

ठळक मुद्देदररोज ४०० रूग्ण : अधीक्षकांना करावी लागते तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे. येथे रुग्णांना रांगेत तास न तास उभे राहण्याची वेळ आली.सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाºयांचे पदे आहेत. तीनही जागा रिक्त आहे. गत पंधरा दिवसाअगोदर डॉ. शकिल यांची तक्रारीवरून बदली करण्यात आली. पण बदली अधिकारी देण्यात आला नाही. ज्या रुग्णालयात दररोज विविध आजाराचे ३०० ते ४०० रुग्ण तपासणीकरिता येतात. त्या रुग्णांची तपासणी करण्यास लागणारा वेळ लक्षात घेता रुग्णांना रांगेत उभे राहून आपला नंबर लागण्याची प्रतिक्षा करावी लागते.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न निर्माण होत आहे तरी येथील रिक्त वैद्यकीय अधिकाºयांची पदे त्वरीत भरून रूग्णालयात येणाºया रूग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी अलिकडेच तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्तचसेलू येथील ग्रामीण रूग्णालय हे जिल्ह्यातील जुने रूग्णालय आहे. पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्याचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात झाले. तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते या रूग्णालय वास्तुचे उद्घाटन झाले. येथे नेहमीच वैद्यकीय अधिकाºयांची पदे पूर्णपणे भरली जात होती. परंतु अलिकडे नेहमीच पद रिक्त राहत आहेत. शासनाचे व लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष आहे. या रूग्णालयात गरमसूर पासून रूग्ण येतात. परंतु वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने अनेक रूग्णांना सेवाग्राम किंवा सांवंगी पाठवावे लागते. त्यामुळे सरकारी रूग्णालयाच्या सेवेचा लाभ नागरिकांना मिळत नाही.रुग्णालयात दररोज ३५० ते ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणी करीता येत आहे. रिक्त असलेल्या पदावर वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र वरिष्ठांना पाठविले आहे.- कीर्ती पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, सेलू.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल