अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सेलू तहसील कार्यालयातील प्रकारझडशी : शासकीय, निमशासकीय कार्यालय असो वा अन्य खासगी कंपनी प्रत्येक ठिकाणी ‘रबर स्टॅम्प’ला (हुद्दा) विशेष महत्त्व असते. कोणत्याही शासकीय कार्यालयातून प्रमाणपत्रे घेताना अधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली असेल आणि त्या प्रमाणपत्रावर शिक्का नसेल तर त्याना महत्व राहत नाही. इतक्या महत्त्वाचे असलेले शिक्के सेलू तहसील कार्यालयात बेवारस स्थितीत पडून आहेत. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.कुठलीही प्रमाणपत्रे घेताना अधिकाऱ्याने सही केली आणि संबंधित अधिकाऱ्याच्या पदाचा ‘रबर स्टॅम्प’ (ठसा) लावला नाही तर ते प्रमाणपत्र गृहित धरले जात नाही. इतकेच नव्हे तर ‘रबर स्टॅम्प’ बनविण्याकरिता जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याकडून संबंधित पदाचे प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत नवीन ‘रबर स्टॅम्प’ बनविता येत नाही.महसूल विभागातील असो वा कुठल्याही विभागातील संबंधित अधिकाऱ्याच्या खोट्या स्वाक्षरी करून गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रामुख्याने ‘रबर स्टॅम्प’ चा वापर केला जातो; पण सेलू तहसील कार्यालयातील जुन्या इमारतीचे नवीन बांधकाम सुरू असल्याने विविध पदाचे काही जुने व काही नवीन ‘रबर स्टॅम्प’ एका कापडात बांधून जुन्या तहसील कार्यालयातील प्रसाधन गृहाजवळ बेवारस ठेवले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
महसूल विभागातील ‘रबर स्टॅम्प’ बेवारस
By admin | Updated: June 12, 2016 01:57 IST