शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजार समितीला 80 लाखांचा फटका; सर्वच समित्या बंदमध्ये सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते.  त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघाट येथील मार्केट बंद राहणार असल्याची माहिती तसेच शेतकरीबांधवांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरी शेतमाल घेऊन आले नाही. 

ठळक मुद्देबुधवारी उसळली शेतकर्यांची गर्दी : देवळी बाजार समितीत चार कोटींची आवक

    लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनांनी मार्केट यार्ड बंद राहणार असल्याची पूर्वसूचना शेतकरीबांधवांना दिली होती. त्यामुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहारच झाले नाहीत. जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते.  त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघाट येथील मार्केट बंद राहणार असल्याची माहिती तसेच शेतकरीबांधवांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरी शेतमाल घेऊन आले नाही. देवळी येथे बंदच्या दुसऱ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या दिवशी चार ते साडेचार कोटींच्या व्यवहारातून चारशे गाड्यांतील कापसाची खरेदी  करण्यात आली. बंदच्या पूर्वसंध्येला बाजारात आलेल्या सर्व कापूस गाड्यांची खरेदी करण्यात आल्याने  शेतकऱ्यांची गैरसोय झाली नाही.  बंदच्या दिवशी मात्र मार्केट यार्डमध्ये कमालीचा शुकशुकाट होता. तर आर्वी येथील बाजार समितीला बंदमुळे ७० ते ८० लाखांचा फटका बसला. या बाजार समितीनेही शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळली. बुधवारी अत्यल्प शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आले होते. वर्धा बाजार समितीही बंद असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. या बाजार समितीत शेतमालाची आवकही अल्पशीच आहे.

दिवसभरात कोटींचे व्यवहार ठप्पयावर्षी सोयाबीनचे उत्पादन ३० टक्के तर नापिकी ७० टक्के अशी स्थिती आहे. कापसाचे उत्पादनदेखील यावेळी निम्म्यावर आले आहे. त्यामुळे सोमवारी आलेल्या मालाची विक्री आणि मोजमाप दुपारपर्यंतच आटोपले. नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे शेतमालाचा अभाव आणि आवक झालेल्या शेतमालाची त्याच दिवशी दुपारपर्यंत विक्री होत असल्याने मार्केटमध्ये गर्दीच होत नाही. परिणामी, यंदाच्या हंगामात रात्री शेतमालाची आवक होत नाही. हिंगणघाट, वर्धा बाजार समितीत ५ ते ७ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

यंदा शेतमालाचे उत्पादन नाममात्रच आहे. बंदमध्ये बाजार समित्या सहभागी झाल्या तरी नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे शेतमालाचा अभाव व मार्केट बंदची माहिती तसेच शेतकऱ्यांचा बंदमध्ये स्वेच्छेने सहभाग यामुळे मार्केटला फटका बसला नाही.  - ॲड. सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट.

भारत बंद असल्याची माहिती पूर्वीच मिळाली. त्यामुळे सोमवारी कुणीही कापूस गाड्या भरून मंगळवारी खरेदी होणार्या काट्यावर आणल्या नाहीत.  बाजार समितीनेही सूचना दिली होती. त्यामुळे बुधवारी कापूस विक्रीसाठी आणण्यात आला. - महेश बावणे, शेतकरी, पिंपळगाव.

भारत बंदची सूचना अगोदरच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून मिळाल्याने बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरीवर्गाने कापूस विक्रीस आणला नाही. बुधवारला कापूस विक्रीसाठी आणला. त्यामुळे कुठलीही गैरसोय झाली नाही.- रणजित तेलंगे, शेतकरी, देऊळगाव.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डcottonकापूस