शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 12:22 IST

मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले.

ठळक मुद्देइहर लिचियामुळे ‘ओरिओ’ची हिमोग्लोबिन पातळी झाली होती चार

महेश सायखेडे

वर्धा : गोचडीपासून पसरणारा आजार अशी इहर लिचियाची ओखळ. रॉटव्हीलर प्रजातीच्या ‘ओरिओ’ या श्वानाला याची लागण झाल्याने त्याची हिमोग्लोबिन पातळी चक्क चारपर्यंत आली. अशा परिस्थितीत मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चक्क त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले. ही ब्लड ट्रान्सफ्यूजन प्रक्रिया पशुचिकित्सक डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.

शहरातील पूलफैल भागातील लेनीन कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला पशुचिकित्सकांकडे उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले. अशातच ओरिओची हिमोग्लोबिन पातळी थेट चारपर्यंत आल्याने त्याला रक्त देण्याची गरज होती.

दरम्यान, याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र या श्वानाचे मालक कुबल भाकरे यांना मिळाली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करून ओरिओचे प्राण वाचविण्यासाठी होकार दिला. शिवाय उपचार करण्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ओरिओचे वडील असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवनदान देण्यात आले. एकूणच मनुष्यासह प्राण्यांमध्येही रक्तदान हे श्रेष्ठदान ठरत आहे, हे विशेष.

ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर देण्यात आले रक्त

मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर ब्लड ट्रान्सफ्यूजन पद्धतीचा वापर करून रुद्र या श्वानाचे रक्त देण्यात आले. या प्रक्रियेसाठी डॉ. संदीप जोगे यांना दीप जगताप, रोहित दिवाने, विशाल मानकर यांनी सहकार्य केले.

रुद्रने यापूर्वी दिले माऊलीला जीवनदान

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या माऊली या श्वानालाही यापूर्वी रुद्र या श्वानानेच रक्तदान करून जीवनदान दिले होते. त्यावेळी माऊली या श्वानाची हिमोग्लोबिन पातळी दोनपर्यंत आली होती, हे विशेष.

टॅग्स :dogकुत्राHealthआरोग्यSocialसामाजिक