शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अठरा एकर उभ्या कपाशी पिकावर फिरविला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंडातून बाहेर आलेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. 

ठळक मुद्देचार शेतकऱ्यांनी कपाशी मोडली

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली. शेतात पिकापेक्षा गवत वाढले. पाने व फुले गळतीने कपाशीच्या शेतात केवळ झाडेच उभी होती. लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने मुरदगाव (बेलसरे) येथील युवा शेतकरी चेतन येंडे यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटावेटर फिरविला. देवळी तालुक्यातील शेतशिवारात कपाशीचे पीक शेतकऱ्यांना चार पैसे हाती देईल, अशा उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने पिकांची स्थिती विदारक झाली. शेतकरी चेतन येंडे यांची मुरदगाव (बेलसरे) येथे पाच एकर शेती आहे. संपूर्ण शेतीसाठी २० हजार रुपयांचे बियाणे घेतले. पेरणीचा खर्च १० हजार रुपये झाला. मशागतीसाठी शेतीला १० हजार लागले. निंदण मजुरी ३० हजार असा एकूण ७० हजार रुपये खर्च लागला. सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंडातून बाहेर आलेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पिकासाठी लावलेला खर्चही वसूल होणार नसल्याने निराश होऊन संपूर्ण पाच एकरातील कपाशी पिकावर रोटावेटर फिरवला आहे. दिवाळी सणाला दिवा लावण्यासाठी व पूजेसाठी नवा कापूस घरी नव्हता, अशी भीषण ओल्या दुष्काळाची परिस्थिती ग्रामीण भागात आहे. पिकावर रोटावेटर फिरविल्याने रब्बी हंगामासाठी पैसा नाही. वर्षभर घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शासन आदेशानंतरही नुकसानीचे पंचनामे अजून झाले नाहीत. मदत पदरात कधी पडेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. चार शेतकऱ्यांनी कपाशी मोडलीयावर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू राहिल्याने मशागतीची कामे करता आली नाही. कपाशी पीक सततच्या पावसामुळे पिवळे पडले असून, फुले आणि पात्या गळतीमुळे पिकाची स्थिती चिंताजनक झाली. पेरणीपासून कपाशी पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नव्हता. त्यामुळे १८ एकर कपाशी पिकावर रोटावेटर फिरवला असल्याची माहिती  मुरदगाव (बेलसरे) येथील शेतकरी सुभाष  येंडे, प्रताप  भलावी, संगीता येंडे, व चेतन येंडे यांनी दिली.

कापसाची शेती यावर्षी तोट्याची ठरली. लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने पाच एकर शेतातील कपाशीवर रोटावेटर फिरवला. कर्जाचा डोंगर कायम असून, सरकारी मदत पदरात कधी पडेल, याकडे लक्ष लागले आहे.- चेतन येंडे, युवा शेतकरी,                    मुरदगाव (बेलसरे) 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती