शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

शेतकऱ्यावर रोह्याचा हल्ला

By admin | Updated: September 3, 2015 01:53 IST

नजीकच्या बोदड शिवारात शेतकरी प्रदीप भाऊराव नरांजे (४०) वर्षे याच्यावर दि. ३१ आॅगस्टला स्वत:च्या शेतात सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान रोह्याने हल्ला केला.

बोदड शिवारातील घटना : तक्रार करुनही वनविभागाकडून बेदखलरोहणा : नजीकच्या बोदड शिवारात शेतकरी प्रदीप भाऊराव नरांजे (४०) वर्षे याच्यावर दि. ३१ आॅगस्टला स्वत:च्या शेतात सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान रोह्याने हल्ला केला. यात त्याच्या हाताला व छातीला गंभीर इजा झालेल्या आहे. रोहणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. या बाबत वनविभागाकडे तक्रार नोंदवूनही अद्याप पंचनामा केला नसल्याची बाब पुढे आली आहे.रोहणा परिसरात दिवसेंदिवस जंगली श्वापदांचा त्रास वाढला आहे. उभ्या पिकांना हानी पोहचविणारे श्वापदे आता शेतकरी व शेतमजूरांवर हल्ला करून हानी पोहचवत आहे. परिसरात दररोज रानडुकरे व रोह्यांच्या कळपाने शेतीच्या नुकसानीसह शेतकरी व शेतमजूरांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वनविभाग जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यात अयशस्वी असूनही घटनेचा पंचनामा करून पीडितांना आर्थिक दिलासा देण्यामध्येही उदासिनता दाखवत आहे. यामुळे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल शेतकरी व शेतमजूरांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. सदर घटना ३१ आॅगस्ट रोजी घडली तरी त्याचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पुढे न पाठविणे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वनविभागाने शेतकरी व शेतमजूरांच्या जंगली श्वापदांपासून होणाऱ्या हानीबाबत संवेदनशील राहावे, अशी मागणी समस्त शेतकरी व शेतमजूरांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)