शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

रस्ते चकाचक एसटीही सुसाट, पाच महिन्यात सात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

एसटीचा  प्रवास हा सुखाचा व सुरक्षित आहे. प्रवाशांना सुविधा देण्याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाते; परंतु विविध कारणाने अपघातही घडत असतात. त्यामुळे अपघात घडल्यास महामंडळाकडून तातडीची मदतही दिली जाते. बहुतांश अपघात हे रस्ते खड्डेमय असल्याने होत असले तरी आता रस्ते गुळगुळीत झाल्यानेही अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षे कोरोनाने आणि आता पाच महिने कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची चाके थांबलेली होती. यात महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि कर्मचाऱ्यांनाही वेतनापासून मुकावे लागले; पण न्यायालयाच्या आदेशानुसार २२ मार्चपासून सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे एसटीही आता पूर्वपदावर आली असून प्रवाशांची सोय झाली. प्रवाशांची गर्दी वाढल्याने जिल्ह्यातील पाचही आगार सध्या हाऊसफुल्ल आहेत.एसटीचा  प्रवास हा सुखाचा व सुरक्षित आहे. प्रवाशांना सुविधा देण्याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाते; परंतु विविध कारणाने अपघातही घडत असतात. त्यामुळे अपघात घडल्यास महामंडळाकडून तातडीची मदतही दिली जाते. बहुतांश अपघात हे रस्ते खड्डेमय असल्याने होत असले तरी आता रस्ते गुळगुळीत झाल्यानेही अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. या रस्त्यावर अनेक वाहने भरधाव वेगाने धावतात त्यातच ओव्हरटेक करणे, समोरुन किंवा मागून धडक देणे, वाहने पलटी होणे, ब्रेक फेल होणे, रस्त्याचा किंवा वळणाचा अंदाज न येणे आदी अनेक कारणांनी अपघात होतात; परंतु एसटीने सायकल स्वार, पादचारी किंवा राज्य परिवहन मंडळातील प्रवाशांचा अपघात झाल्यास त्यांना तातडीने मदत दिली जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना अपघात झाल्यास तातडीने मदत किंवा लाभही मिळत असल्यामुळेच नागरिकांकडून लालपरीच्या प्रवासाला अधिक पसंती दिली जाते. 

अपघातानंतर मदतीसाठी काय कराल अपघात झाल्यानंतर परिवहन महामंडळाकडून मदत केली जाते. जखमींना पी-फॉर्म दिला जातो. फाॅर्म भरून दिल्यावर उपचारासाठीचा खर्च महामंडळ करीत असते. 

६५चा स्पीड लॉक एसटीलाप्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीचा अपघात घडू नये म्हणून एसटीचा ६० किंवा ६५ च्या स्पीडवर बस ब्लॉक केल्या जातात. अचानक अपघाताचा प्रसंग आला तर चालक बस नियंत्रणात ठेवू शकतो यासाठी वेगावर मर्यादा लावली जात असते.

एसटी सहायता निधी अंतर्गत दिली जाते मदतएसटीचा अपघात झाल्यास त्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना सहायता निधी अंतर्गत दहा लाखाची मदत दिली जाते. तर गंभीर जखमींना पाच लाखापर्यंत मदत केल्या जाते. जखमी कोणत्याही रुग्णालयात भरती असेल तर उपचारासाठीचा खर्च महामंडळ करते. अपघात झाल्यावर तातडीने किरकोळ जखमी झालेल्यास पाचशे रुपये तर जास्त असल्यास हजार रुपये मदत दिली जाते. मागील वर्षी २० जणांना मदत करण्यात आली; मात्र या पाच महिन्यांत ते निकषात बसत नसल्याने मदत करण्यात आली नाही. 

पाच चालकांना उजळणी प्रशिक्षणअपघात हा सांगून होत नाही; मात्र कुठल्याही वाहनाला पावसाळ्यात अपघात घडण्याचा धोका जास्त असतो. कारण रस्त्यावर खड्डे असेल तर त्यात पाणी साचते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. तर पावसाळ्यात वादळ- वाऱ्याने झाडेझुडपे पडतात. वीज, पाऊस यामुळे ही अंदाज येत नाही. ही बाब लक्षात घेऊन एसटी बस चालकांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यात महत्त्वाच्या सूचना व माहितीचे हे प्रशिक्षण असते तसेच अपघात झाल्यास पुन्हा दहा दिवसांचे ट्रेनिंग दिले जाते.

 

टॅग्स :state transportएसटी