५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:10 PM2018-03-17T22:10:25+5:302018-03-17T22:10:25+5:30

आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.

Roads in 58 talukas in three talukas | ५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

Next

ऑनलाईन लोकमत
आर्वी : आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.
आर्वी तालुक्यातील रोहणा-दिघी-सायखेडा रस्त्याकरिता १९० लाख रुपये, पिंपळखुटा-दाणापूर-ब्राह्मणवाडा-खैरवाडा पुलाच्या बांधकामासह रस्त्यासाठी २०० लाख रुपये, सावळापूर-लहादेवी-पांजरा- दहेगावकरीता १८० लाख रुपये, काचनुर-तळेगाव-पानवाडी रस्त्यासाठी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याकरीता ५४३ लाख रुपये, वडाळा-साहूर- माणिकवाडा- सुसुंद्रा रस्त्यासाठी ५१८ लाख रुपये, नांदपूर-चिस्तुर-खडकी रस्त्यासाठी ३४७ लाख रुपये, पोरगव्हाण - पंचाळा रस्त्यासाठी २१० लाख रुपये, खडकी-खंबीत-बेलोरा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कारंजा तालुक्यातील हिंगणी-बोरधरण-गरमसुर-मेटहिरजी-धानोली-राहाटी-सावली रस्त्यासाठी ५९५ लाख रुपये, पिंपळखुटा- दाणापूर-खैरवाडा -ब्राह्मणवाडा रस्त्यासाठी ४१५ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर मार्गासाठी ४०२ लाख रुपये, पार्डी- सारवाडी-सावळी-चिंचोली-सेलगाव (उ)-उमरी-धावसा-कन्नमवारग्राम या मार्गासाठी ३९६ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर रस्त्यासाठी ३२५ लाख रुपये, वडाळा-साहूर-माणिकवाडा-सुसुंद्रा-काकडा-परसोडी -सेलगाव-ठाणेगाव रस्त्यासाठी ३२४ लाख रुपये, तसेच याच रस्त्यावरील अंतर २१ ते ३३ कि.मी. करीता २८४ लाख रुपये, कारंजा-मोर्शी- खरसखांडा मार्गासाठी २३६ लाख रुपये, काटोल-धर्ती-बोरी-ठाणेगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी १७० लाख रुपये, ठाणेगाव-खरसखांडा- सावळी मार्गासाठी १०५ लाख रुपये, कारंजा (घा.)मधील बायपास करीता ७६ लाख रुपये, ढगा-ब्राह्मणवाडा या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
रस्त्यांची झाली होती चाळणी
आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली होती. सदर मार्गांवरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात घेता माजी आमदार दादाराव केचे व सुमीत वानखेडे यांनी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली.

Web Title: Roads in 58 talukas in three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.