Road construction was stopped for six months | सहा महिन्यांपासून रस्त्याचे बांधकाम रखडले
सहा महिन्यांपासून रस्त्याचे बांधकाम रखडले

ठळक मुद्देनांदोरा (डफरे) ते मुरदगाव (खोसे) रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : जि.प. बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियोजन शुन्यतेमुळे नांदोरा डफरे ते मुरदगाव खोसे पर्यंतचा रस्ता रखडून पडला आहे. या रस्त्याला जागो जागी खड्डे पडल्याने हा रस्ता माणसाला पायदळ चालण्या योग्य सुद्धा राहिला नाही. मागील सात वर्षांपासून हिच परिस्थिती राहिल्याने नागरिकांत रोष आहे. अशातच मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत गेल्या सहा महिन्यापूर्वी हा रस्ता मंजूर करण्यात आला. रस्ता बांधकामावर खर्च होणारा १ कोटी ७९ लाखांचा निधी सुद्धा उपलब्ध झाला परंतु अधिकाऱ्यांच्या लालफीतशाहीमुळे यंत्रणाच न हलल्याने या रस्त्याचे काम थंडबस्त्यात पडले आहे.
तालुक्यातील मुरदगाव खोसे, फत्तेपूर दुरगुडा, इंझाळा, रत्नापूर व परिसरातील इतर गावांना जोडणारा हा रस्ता गेल्या सात वर्षांपासून दुर्लक्षित ठरला आहे. जागो जागी खड्डे पडल्याने या रस्त्यावर मोटर सायकल व वाहने चालविणे कठीण झाले आहे. नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेता गेल्या सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत एक कोटी ७९ लाखाच्या खर्चातून हा रस्ता मंजूर करण्यात आला. बांधकाम प्रशासनाकडे निधी सुद्धा उपलब्ध झाला. रस्ता रूंदीकरण, खडीकरण, पिचिंग, डांबरीकरण तसेच यशोदा नदीच्या पुलाचे सौंदर्यीकरणासोबतच नदीवर सेप्टीगार्ड बसविण्याच्या कामांचा रस्ता बांधकामात समावेश करण्यात आला.
परंतु मागील सहा महिन्यांपासून प्रशासकीय स्तरावर वेगवेगळी कारणे सांगून यंत्रणाच सुस्त आहे. रस्ता बांधकामाच्या निविदा काढुन प्रत्यक्ष बांधकामाची ताबडतोब सुरूवात करण्यात यावी अशी मागणी आहे.

Web Title: Road construction was stopped for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.