शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:47 IST

दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती

संडे अँकर । केळझर येथे ग्रा.पं.कडून अत्यल्प पाणीपुरवठाउन्हाळ्याच्या सुरूवातीलाच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून गावाला ग्रा.पं.कडून घरगुती नळांना अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडणुकीत दंग असल्याने गावातील प्राथमिक सोई सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नदीकाठावरील गावे सुजलाम् सुफलाम् असतात. यावर्षी मात्र हा समज खोटा ठरायला लागला आह. कधी नव्हे, तर या महाशिवरात्रीला नदीत पाणीच नसल्याचे दिसून आले. पाणीटंचाईचे संकेत असल्याचे जाणकारांतून बोेलले जात आहे.याच नदीच्या काठावर देर्डा गाववासीयांना पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची जलपातळी खालावल्याने एक दिवसाआड पाणी गावात नळ योजनेअंतर्गत पुरविल्या जात आहे. यामुळे मार्च महिन्यातच जलसमस्येच्या झळा गावकरी सोसत आहेत.ग्रामस्थांचे शेती आणि मजुरी हेच व्यवसाय आणि रोजगाराचे साधन आहे. नदीवर जवळपास दहा मोटरपंप असून पºहाटी, तुरी, चणा, गहू आणि चारा अशी पिके शेतकरी घेतात. पण फेब्रुवारीत नदी आटल्याने शेतकरी हवालदिल झाले. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. चारा नाही. जनावरांच्या पाण्याचा पण प्रश्न शेतकरी व गोपालकांना भेडसावत आहे. वाढत्या पाऱ्यामुळे सर्वत्र रखरख झाल्याने जनावरे चरणार तरी कोठे? नदीकाठावर विहीर असल्याने आतापर्यंत समस्या जाणवली नाही. यावेळी मात्र नदी आटल्याने पाणीसमस्या अधिक बिकट झालेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई