शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रेतीमाफियांची धामवर वक्रदृष्टी

By admin | Updated: May 12, 2015 02:03 IST

रेतीघाट म्हणून शासनदरबारी कुठलीही नोंद नसलेल्या पवनार येथील धाम नदीवर रेती माफियांनी मोर्चा वळविला आहे. येथे

डोळ्यांदेखत सर्रास उत्खनन : रेती उपस्याची शासकीय दरबारी कुठलीही नोंद नाहीपराग मगर ल्ल वर्धारेतीघाट म्हणून शासनदरबारी कुठलीही नोंद नसलेल्या पवनार येथील धाम नदीवर रेती माफियांनी मोर्चा वळविला आहे. येथे कोणाचे लक्ष राहत नसल्याची संधी साधत पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. उघड्यावर होत असलेला हा रेती उपसा साऱ्यांच्या नजरेस पडत असला तरी यावर कुणाकडूनही कारवाई होताना दिसत नाही. जिल्ह्यातील काही नद्यांवर ठराविक ठिकाणी रेतीघाट देण्यात आलेले आहे. त्याची शासनदरबारी नोंद आहे. या घाटांचा लिलाव होवून त्यातून रेती काढली जात आहे. यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेतीचे नियमबाह्य उत्खनन होत आहे. यावर कारवाई करण्याकरिता अनेक वेळा शासनाच्यावतीने धडक मोहीम राबविल्या गेली. यात घाटांवर कारवाईच्या नावावर कागद काळे केले जात असल्याचे समोर आले आहे. कुणावरही विशेष कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे. नदीवर रेतीघाट देताना बरेच नियम आहेत. यातील सर्वच नियम पाळले जातात असे नाही. त्यातील अनेक नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. याचेचे उदाहरण पवनार येथे दिसून येत आहे. येथे घाटाची कुठलीही परवानगी नसताना धाम नदीपात्रातून रेतीचा उपसा होत आहे. या नदीपात्रातून दररोज एक ते दोन ट्रॉली रेतीचा उपसा केला जातो. मुख्य म्हणजे स्वत:च्या उपयोगासाठी हा रेतीउपसा केला जात नाही तर विकण्यासाठी ही रेती काढली जात आहे. सर्वांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असताना कुणीही याबद्द्ल एक शब्दही काढत नाही. त्यामुळे अनेक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. त्यांच्याकडून पटवाऱ्याला याची कल्पना देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून पोलीस प्रशासनाला कुठलीही कल्पना देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. धरणातूनही काढली जाते रेती४पवनार येथे धाम नदीवर धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. महाकाळी धरणातून येथे पाणी सोडले जाते. या धरणातून वर्धा नगर परिषद तसेच भूगाव येथील स्टील प्लांटसाठी पाणीपुरवठा केला जातो. या कारणाने दरवर्षी येथे बरीच वाळू वाहून येते. हीच रेती मजुरांच्या सहाय्याने काढून ती गाळून ती विकली जात आहे. दर्गाह टेक डीच्या मागल्या बाजूनेही होतो उपसा४रेतीउपसा करीत असलेल्या चोरट्यांनी आपल्या जागा निश्चित केल्या असून अनेक ठिकाणांवरून पवनार परिसरात रेतीउपसा केला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने याच काळात पात्र कोरडे पडत असते. याचाच फायदा घेत रेतीचोरटे सक्रीय होतात. दर्गाह टेकडीच्या मागल्या बाजूलाही रेतीचा उपसा होतो. परंतु यामुळे टेकडी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतीची कामे नसल्याने हा व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात येते. भर पाण्यातून उपसा४रेतीचा उपसा करताना नदीला पाणी आहे, एखादी दुर्दैवी घटना शक्यता असताना कुठलीही काळजी न करता भर पाण्यातून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. पाण्यातून काढलेल्या रेतीचा ढिग लावून ती चाळणीने गाळून विकल्या जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.