शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या सरपंचास सश्रम कारावास; दोन वर्ष रहावे लागेल कारागृहात

By महेश सायखेडे | Updated: August 26, 2023 13:04 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वर्धा : स्वाक्षरी देण्यास नकार देत वाद करून ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या वडद येथील तत्कालीन सरपंच सुशील जर्नादन वडतकर यास दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ व्ही. पी. आदोने यांदी दिला.

आरोपी सुशील जनार्दन वडतकर यास भादंविच्या कलम ३५३ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास चार महिन्यांचा सश्रम कारावास. भादंविच्या कलम ३३२ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास चार महिन्यांचा सश्रम कारावास. अजाजअप्रकाच्या कलम ३ (२) (va) अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

उगारली होती चप्पल

या प्रकरणातील फिर्यादी हे वडद येथे ग्रामसेवक म्हणून काम करायचे. विद्युत देयक न भरल्यामुळे जि.प.च्या शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. शाळेत मतदान केंद्र असल्याने विद्युत पुरवठा सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे फिर्यादीने वर्धा पंचायत समिती कार्यालयातील कक्षात वीज जोडणी नसल्याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून संबंधित सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आदेश असल्याने अनुशंगाने फिर्यादी हे नोटशिट व फाईल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. त्यांना सरपंचाची स्वाक्षरी त्यावर हवी होती. आरोपी वडदचे तत्कालीन सरपंच सुशील वडतकर याने स्वाक्षरी देण्यासाठी नकार देत फिर्यादीसोबत वाद करून चप्पल उगारत हाता बुक्यांनी मारहाण करून लोकसेवकाला त्यांचे कामकाज पार पाडण्यात अटकाव केला. शिवाय दुखापत केली होती.

एसडीपीओंनी केला होता तपास

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यावर संबंधित प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. शासकीय बाजू ॲड. एच. पी. रणदीवे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सुजित पांडव व देवेंद्र कडू यांनी काम पाहिले. शासनातर्फे एकूण नऊ साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ व्ही. पी. आदोने यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालयwardha-acवर्धाsarpanchसरपंच