शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चारही पोलीस ठाण्यात हक्काची ‘पार्किंग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

शहरातील रामनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन आणि सावंगी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस ठाण्यांकडे हक्काची पार्किंग आहे. त्यामुळे पोलिसांना पोलीस ठाण्याबाहेर वाहने उभी करण्याची गरजच पडत नाही. जर एखाद्याने नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगादेखील उगारला जातो. त्यामुळे पोलीस जरी असतील तरी त्यांना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागेल, असे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश कडू यांच्याकडून सांगण्यात आले. 

ठळक मुद्देपोलिसांकडून नियमांचे होतेय पालन : नो पार्किंगमध्ये वाहने लावल्यास कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय परिसराचा फेरफटका मारला असता चारही पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे हक्काची पार्किंग असल्याचे रिॲलिटी चेक केले असता दिसून आले. मात्र, जे पोलीस नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात असल्याचे दिसून आले. शहरातील रामनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन आणि सावंगी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस ठाण्यांकडे हक्काची पार्किंग आहे. त्यामुळे पोलिसांना पोलीस ठाण्याबाहेर वाहने उभी करण्याची गरजच पडत नाही. जर एखाद्याने नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगादेखील उगारला जातो. त्यामुळे पोलीस जरी असतील तरी त्यांना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागेल, असे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश कडू यांच्याकडून सांगण्यात आले. शहरातही मोठ्या प्रमाणात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. मागील दोन वर्षांत अनेकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवरही पोलिसांचे लक्ष असून त्यांची गय केली जाणार नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून पोलिसांकडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई केल्या जात आहे.

रामनगर पोलीस ठाणे शहरातील रामनगर परिसरात असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात हक्काची पार्किंग असून कर्मचारी आणि अधिकारी आपली वाहने शिस्तबद्ध परिसरात लावत असल्याचे दिसून आले. तसेच तक्रार घेऊन येणाऱ्यांकडूनही शिस्तीतच वाहने लावण्याच्या सूचना ठाणेदार जळक यांनी दिल्या असल्याने कर्मचाऱ्यांकडून तक्रारकर्त्यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

शहर पोलीस ठाणेशहर पोलीस ठाण्याकडेही हक्काची पार्किंग असल्याने ठाण्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची वाहने पार्किंग परिसरातच उभी राहत असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर जप्त केलेली वाहने पार्किंग परिसरात राहत असल्याने वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे जप्तीतील सर्व वाहने दुसऱ्या बाजूला शिफ्ट करून ठाण्यासमोरील सर्व मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे.

सावंगी पोलीस ठाण्यात जागा अपुरी - शहरातील सावंगी (मेघे) पोलीस ठाणे रस्त्याच्या कडेला असल्याने पोलीस ठाण्याकडे हक्काची पार्किंग जरी असली तरी अपुऱ्या जागेमुळे अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावावी लागत असल्याचे चित्र आहे.- मात्र, पोलीस अधिकाऱ्यांची वाहने पार्किंगमध्येच राहत असून काही प्रमाणातच वाहने पुरेशा जागेअभावी रस्त्याच्या कडेला लावावी लागत असल्याचे दिसून येते.

शहरातील चारही पोलीस ठाण्यांत हक्काची पार्किंग उपलब्ध असल्याने पोलीस कर्मचारी आपली वाहने पोलीस ठाण्यातच उभी करतात. मात्र, जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई नक्कीच केल्या जाईल. शहरातही नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. -राजेश कडू,  वाहतूक पोलीस निरीक्षक.  

 

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस