शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार; कलम ४ बाबत सामान्य जनता अनभिज्ञ

By admin | Updated: March 14, 2015 02:02 IST

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी ...

वर्धा : प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ मंजूर करण्यात आला़ कायदा होऊन तब्बल दहा वर्षे लोटत आहेत; पण अद्यापही या कायद्याची संपूर्ण माहिती सामान्य नागरिकांना उपलब्ध होत नाही़ शिवाय प्रशासनही या कायद्याचे तंतोतंत पालन करीत नसल्याचेच दिसते़ यामुळे जिल्ह्यात केवळ एकाच कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ चे पालन होत असल्याचे समोर आले आहे़माहिती अधिकार कायद्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ याबाबत संपूर्ण कार्यालयांमध्ये माहितीचा फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे़ हे फलक बहुतांश कार्यालयात लावलेले आहे; पण त्यातही अधिकारी बदलल्यास फलकावरील नाव बदलण्याची तसदी घेतली जात नाही़ अनेक कार्यालयांत सदर फलकही लावण्यात आलेले नाहीत़ कायदा पारित होऊन १० वर्षे लोटत असून अनेक अधिकाऱ्यांवर या कायद्याचा जरबही बसला आहे तरी कायद्याचे पालन करण्यात हयगय होत असल्याचे वास्तव आहे़ माहिती अधिकार कायद्यातील कलम चारबाबत संपूर्ण नागरिकांना माहिती असणे गरजेचे असते; पण त्याचे जिल्ह्यात कुठेही पालन होताना दिसत नाही़ माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारमध्ये संबधित शासकीय कार्यालयाची माहिती अंतर्भुत करणे गरजेचे असते़ जिल्ह्यात एक कार्यालय सोडले तर कुठेही कलम चारबाबत माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवल्याचे आढळून येत नाही़ वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सदर माहिती लावण्यात आलेली आहे़ यात कलम चारमध्ये नमूद केल्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत कर्मचारी ते कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत माहिती नमूद करण्यात आलेली आहे़ यामुळे एसडीओ कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांना अधिक विचारणा करण्याची गरज पडत नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)संबंधित विभागातील कर्मचारी ते कर्तव्यांची माहितीमाहिती अधिकारी अधिनियम २००५ च्या कलम ४ (१) नुसार संबंधित कार्यालयाची रचना, कर्तव्ये, जबाबदाऱ्या यासह कुठली कामे सदर ठिकाणी केली जातात, त्यासाठी किती कालावधी लागतो, ती कामे न झाल्यास जबाबदार कोण आदी इत्यंभूत माहिती प्रसिद्ध करावी लागते़ जिल्ह्यात कोणत्याही कार्यालयात ही माहिती दिली जात नाही; पण उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या कलमाचे पालन करीत कलम ४ ची संपूर्ण माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून दिलेली आहे़ उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेल्या या माहितीमुळे सामान्य नागरिकांना आपली कामे कुणाकडे न्यावी लागतात, त्यासाठी किती कालावधी लागतो, कामे न झाल्यास कुणाकडे दाद मागावी हे कुणाला विचारण्याची गरज पडत नाही़ जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी तत्सम माहिती सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते़