शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वर्धेतून ५० कट्टे गव्हासह तांदूळ जप्त

By admin | Updated: December 13, 2015 02:11 IST

शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सेलू तालुक्यातील बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला गुरुवारी सील ठोकण्यात आले.

सेलूतील शासकीय धान्याचा काळाबाजार : पोलीस फरार आरोपींच्या मागावर वर्धा : शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सेलू तालुक्यातील बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला गुरुवारी सील ठोकण्यात आले. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी यात सहभागी असलेल्या एका व्यापाऱ्याच्या गोदामातून ५० कट्टे गहू व १० कट्टे तांदूळ असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आढळलेला मुद्देमाल याच दुकानातील असल्याचा संशय असला तरी त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शुक्रवारीच दोघांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध विशेष पथकाचे पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेला वर्धेतील धान्य व्यापारी मुकिंदा सोमनाथे व त्याचा चालक चंद्रशेखर सावळे यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यात त्यांनी गत काही दिवसांपूर्वी या प्रकरणात सहभागी असलेला धान्य व्यापारी पंकज चिथलोरे याच्या गोदामात सेलू येथे आलेले शासकीय धान्य पोहोचविल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून विशेष पथकाच्या पोलिसांनी सदर गोदामात धाड घातली. येथून मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य जप्त करण्यात आले. शासकीय किमतीनुसार जप्त करण्यात आलेला धान्य साठा ४० हजार रुपयांचा असला तरी त्याची धान्य बाजारातील किंमत अधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सेलू तालुक्यातील इंदिरा महिला उत्पादक सहकारी संस्थेच्या नावे बेलगाव येथे स्वस्त धान्य दुकान मंजूर आहे. या दुकानात गरजवंतांकरिता येत असलेल्या शासकीय धान्याची अफरातफर होत असल्याचे गुरुवारी रात्री सेलूचे तहसीलदार डॉ. रवींद्र कोळी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. यामुळे संस्थेचे प्रमूख व सेलू येथील नगर पंचायतीचे उपाध्यक्ष चुडामण हांडे यांच्यासह वर्धेतील मुकिंदा सोमनाथे त्याच्या वाहनाचा चालक चंद्रशेखर सावळे वर्धेतील धान्य व्यापारी पंकज चिथलोरे व धान्य बाजारातील दलाल नितीन घाटे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुकिंदा सोमनाथे व चंद्रशेखर सावळे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या दोघांकडून आणखी माहिती मिळते काय, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी धनंजय सायरे यांनी दिली. (प्रतिनिधी)सेलू तहसीलदारांना विक्री पुस्तिकेची प्रतीक्षा या प्रकरणात तहसीलदारांसह पोलिसांनी एकत्र धाड घातली असता येथून काही कागदपत्र जप्त करण्यात आले. यापैकी साठा पुस्तिका व पावती पुस्तक तहसीलदारांच्या हवाली करण्यात आले. मात्र विक्री पुस्तिका त्यांना अद्याप मिळाले नाही. या कारवाईत पोलिसांनाही ती मिळाली नसल्याची माहिती आहे. विक्री पुस्तिका संथेच्या प्रमुखाच्या घरी असण्याची शक्यता आहे; मात्र संस्थेचा प्रमुख पसार झाला असल्याने त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत साठा पुस्तिका हाती आली आहे. विक्री पुस्तिका मिळण्याची प्रतीक्षा आहे. ती मिळताच यात किती धान्याचा घोळ झाला याचा खुलासा होणे शक्य असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.कारवाई राजकीय षड्यंत्रातून असल्याची चर्चासेलू नगर पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपश्रष्ठींनी व्हीप जारी करून भाजप सदस्यांना दफ्तरी गटाला मतदार करण्याचे आदेश दिले होते. मात्र चुडामण हांडे यांनी पक्षादेश बाजुला सारुन काँग्रेसची हातमिळवणी केली. हीच बाब त्यांच्या अंगलट आली. त्यांच्यावरील कारवाई राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा सेलूत जोरात सुरू आहे.