शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
3
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
4
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
5
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
6
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
7
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
8
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
10
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
11
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
12
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
13
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
14
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
15
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
16
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
18
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
19
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
20
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

आर्वीच्या दोन प्रभागातील नागरिकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

आकोला येथील २४ वर्षीय महिला एक महिन्याचे बाळ व पतीसह चारचाकी वाहनाने आर्वीतील सिंदी कॅम्प परिसरात माहेरी आली. तिला माहेरी सोडून पती व वाहनचालक पुन्हा अकोल्याला निघून गेले. महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला गृह विलगीकरणात ठेवून त्याचे स्वॅब अहवाल तपासणीकरिता पाठविले होते. आज अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये महिला ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक ३ व ६ चा समावेश : माहेरी आलेल्या महिलेचा अहवाल आला पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : शहरामध्ये होम क्वारंटाईन असलेल्या महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णाच्या घराकडे धाव घेत प्रभाग क्रमांक ३ व प्रभाग क्रमांक ६ मधील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे आता या परिसरातील जवळपास दोनशे घरांतील नागरिकांना १४ दिवसापर्यंत प्रतिबंध घालण्यात आले आहे.आकोला येथील २४ वर्षीय महिला एक महिन्याचे बाळ व पतीसह चारचाकी वाहनाने आर्वीतील सिंदी कॅम्प परिसरात माहेरी आली. तिला माहेरी सोडून पती व वाहनचालक पुन्हा अकोल्याला निघून गेले. महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला गृह विलगीकरणात ठेवून त्याचे स्वॅब अहवाल तपासणीकरिता पाठविले होते. आज अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये महिला ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाने लगेच सिंधी कॅम्प परिसराकडे धाव घेत तिला बाळासह पुढील तपासणीकरिता सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्रमांक ३ व प्रभाग क्रमांक ६ मधील काही परिसरात कंटेन्मेट झोन तर उर्वरित परिसरात बफर झोन जाहीर केला आहे. रुग्णाच्या अतिसंपर्कातील ५ तर कमी संपर्कातील १६ असे एकूण २१ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. यापैकी १२ व्यक्तींना हैबतपूर येथे तर उर्वरित व्यक्तींना उपजिल्हा रुग्णायलात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता पाठविले जाणार आहे.शहरातील हे आहेत कंटेन्मेंट झोन व बफर झोनकंटेन्मेट झोन : नगरपरिषद आर्वी प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ३ यामधील उत्तरेकडील निरंजन वानखेडे यांच्या घरापासून सार्वजनिक शौचालय ते मशिद कॉर्नर, पश्चिमेकडील मशिद कॉर्नरपासून इकबाल सॉ मिल ते विठ्ठल मंदिर (तलाव रोड), दक्षिणेकडील विठ्ठल मंदिरपासून गुरुनानक धर्मशाळा ते गहूकर यांच्या नाल्याजवळील शेतापर्यंत तर पूर्वेकडील गहूकर यांच्या नाल्याजवळील शेतापासून निरंजन वानखेडे यांच्या घरापर्यंत.बफर झोन : कंटेन्मेंट क्षेत्र वगळता आर्वी नगरपरिषद हद्दीचे संपूर्ण क्षेत्र.एकाच दिवशी दोन रुग्णांची भरजिल्ह्यात हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज एकाच दिवशी दोन रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची १९ वर पोहोचली आहेत. यामध्ये वर्ध्यातील ८, वाशीम १, अमरावती ४, नवी मुंबई ३, गोरखपूर १, ओडिशा १ व अकोला येथील १ रुग्णाचा समावेश आहे. यापैकी वर्ध्यातील एक रुग्ण मृत आहे.सावंगीच्या परिचारिकेची नातेवाईक युवती कोरोनाबाधितसावंगी येथील परिचारिका कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाकडून तिच्या पतीसह चौघांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी १९ वर्षीय युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर तिघांचे निगेटिव्ह आले आहेत. या कोरोनाबाधित युवतीला पुढील तपासणीकरिता सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.२० हजारांवर नागरिकांचे सर्वेक्षणजिल्ह्यातील वर्धा, हिंंगणघाट, आर्वी व आष्टी या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार त्या परिसरात क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना राबविण्यात येत आहे. सध्या या चारही तालुक्यांमध्ये ६ कंटेन्मेट झोन जाहीर केले असून त्या ठिकाणी ९४ सर्वेक्षण पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. आतापर्यंत २० हजार ७३१ नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रतिबंधित उपाययोजना सुरु केल्या. या परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून येथे जाण्या-येण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले. अत्यंत महत्त्वाच्या कामाकरिता पूर्व परवानगी व ओळखपत्रासह जाण्या-येण्याकरिता विठ्ठल मंदिराजवळ मार्ग देण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी, आर्वी.सिंधी कॅम्प परिसर आणि राणी लक्ष्मीबाई वॉर्डाचा संपूर्ण परिसर चारही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. या परिसरातील दोनशे कुटुंबियांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.डॉ.संगीता झोपाटे, तालुका आरोग्य अधिकारी, आर्वी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या