शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:57 IST

लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली.

ठळक मुद्देनागपुरात बैठक : जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा, बैतुल येथील खासदार ज्योती धुर्वे, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसुड, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, व वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थितीत होते.वर्धा रेल्वे स्थानकाला विकसीत करण्याकरिता चर्चा करण्यात आली. पुलगांव, धामणगांव, वरुड, मोर्शी, चांदूर, सेवाग्राम, सिंदी, तुळजापूर या स्थानकावर प्रवाशी सुविधांमध्ये वाढ करणे, सेवाग्राम रेल्वे स्थानकापासून इतवाराकडे येणाऱ्या हद्दीतील रस्त्याची सुधारणा करणे, वर्धा देवळी कारंजा आष्टी आर्वी समुद्रपूर येथे डाकघरामध्ये आरक्षण केंद्र निर्माण करणे, पोरबंदर हावडा एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा देणे, आंध्रप्रदेश एक्सप्रेसला सेवाग्राम येथे थांबा, हावडा कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा. तुळजापूर व सिंदी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसचा थांबा, तुळजापूर रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाची निर्मिती करणे, बल्लारशाह दरम्यान नविन इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा प्रारंभ करणे, सिकंदराबाद- नागपूर या एक्सप्रेस, चेन्नई जोधपूर व सिंकदराबाद- अजमेर या गाडींला हिंगणघाट येथे थांबा देणे, गरीबरथ एक्सप्रेसला धामणगांव येथे तर काजीपेठ- पुणे एक्सप्रेसला चांदूर येथे थांबा आदी मागण्याबाबत खा. तडस यांनी आग्रही भूमिका घेतली. चांदूर रेल्वे येथील शौचालयाची समस्या, हमसफर एक्सप्रेसला सेवाग्राम व हिंगणघाट येथे थांबा मिळणे, वर्धा-यवतमाळ-नांदेड या नविन रेल्वे लाईनच्या कामाला गती देण्यासोबतच पुलगांव -आर्वी शंकुतला रेल्वेचा प्रस्ताव, आर्वी-वरुड नविन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, वर्धा रेल्वे स्थानकावरील मालधक्काच्या वेळापत्रकात बदल करणे, सफाई कामगाराच्या समस्या सोडविणे, अमरावती जिल्हयातील खेड रेल्वे स्थानकावर यासह विविध ३८ मुद्दयावर खासदार रामदास तडस यांनी बैठकीमध्ये चर्चा घडवून आणली.रेल्वे विभागाच्यावतीने वर्धा, सेवाग्राम, धामणगांव, पुलगांव, हिंगणघाट, या रेल्वे स्थानकावर शेडचा विस्तार करणे, वर्धा रेल्वे स्थानकावर आधुनिक एलईडी एंडीकेशन बोर्ड लावणे, वर्धा रेल्वेस्थानकावर अतिरीक्त पादचारी पुलाचे बांधकाम करणे यासह पुलगांव,धामणगांव प्लॅटफार्मचा सुधार करणे, सेवग्राम रेल्वेस्थानकाचा विस्तार करुन पायाभुत सुविधाचा विकास सोबत अतिरीक्त पादचारी पुलाचे बांधकाम करणे,यासोबतच प्रवाश्यांच्या सुविधाकरिता सीसीटीव्ही प्रणाली विकसीत करणे आदी महत्वपुर्ण कामाचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्य खासदारांनी समस्या मांडल्या.

टॅग्स :railwayरेल्वेRamdas Tadasरामदास तडस