शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:22 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावर होणार सन्मान : आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली यंत्रणा

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अंत्यत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणारी ही यंत्रणा शेतीसाठी लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनात या यंत्रणेची दखल घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आता राज्यस्तरावर ही यंत्रणा प्रदर्शनासाठी पाठविली जाणार आहे.शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासोबतच वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान होण्याच्या संकट येते. अनेकवेळा माकडे, रानडुकर, पक्षी आदी शेतमाल उपडून फेकून देतात. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त होतो. ही बाब यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी या उद्देशाने आयअीआयतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टमी प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून रात्री दिवसा वन्यप्राण्यांपासून शेतामालाचा बचाव करता येणार आहे.शेतात दिवसा माकडांच्या टोळ्या फिरतात. तसेच नुकतेच पेरलेले बियाणे व हरभऱ्याचे दाणे टिपणाºया पक्ष्यांपासूनही बचाव करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या तंत्र प्रदर्शनात या प्रणालीचे अवलोकन करून तिची राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली आहे.काय आहे प्रणालीसिंगल फेज एसी सप्लाय तसेच इन्व्हर्टर बॅटरी किंवा सौर उर्जेवर चालण्यास सक्षम असणारी ही प्रणाली आहे. यामध्ये संपूर्ण शेताला कुंपण करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीच्या कक्षेत जंगली श्वापद आल्याबरोबर ते दूर पळविण्यासाठी स्वयंचलित प्रणाली पूर्णपणे आपोआप कार्यान्वित होते. हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यासाठी मोठ्या खर्चाची गरज नाही.