वर्धा : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते, अशा ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ या अंकाचा लोकार्पण सोहळा गुरूवारी लोकमत कार्यालयात थाटात पार पडला. या अंकातील मजुकाराची माहिती लोकमत दररोजच्या अंकात देत असल्याने त्याचा दर्जा उत्तम असेल. शिवाय तो वाचनीय असणार, यात तिळमात्र शंका नाही, असे गौरोवोद्गावर मान्यवरांनी लोकमत दीपोत्सव - २०१५ च्या प्रकाशन सोहळ्यात काढले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्यकारी अध्यक्ष सुनील पाटणकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख उमेश शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सवाचे विमोचन करण्यात आले. यंदाच्या दीपोत्सव अंकाचे १५०० अंक वितरीत करण्याचा विक्रम वर्धा जिल्ह्याने नोंदविला. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ‘लोकमत’ने नेहमीच नाविण्यपूर्ण, वाचनीय मजकूर वाचकांना दिला आहे आणि देत आहे. दीपोत्सवाचे मुखपृष्ठ जुन्या आठवणींना उजाळा देणारे आहे. अंतरंगातूनही वाचनीय मेजवाणी वाचकांच्या पुढ्यात ठेवली आहे, असेही मान्यवर म्हणाले. सोहळ्याचे प्रस्ताविक व संचालन जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)सग्रही ठेवणारा अंक - विलास कांबळे४लोकमतने सतत वाचकांना वाचनीय आणि संग्रही ठेवणारा मजकूर दिला आहे. या अंकातही तेच असल्याचे सारांशावरून लक्षात येते. जनतेला न्याय मिळवून देणारे वृत्तपत्र अशी लोकमतची ओळख सामान्य जनात आहे. ती आजतागायत कायम आहे. आणि यापुढेही कायम राहील, य्२ाात तीळमात्र शंका नाही.वाचकांसाठी दर्जेदार साहित्य-प्रदीप दाते ४कमी किंमतीत वाचकांना दर्जेदार साहित्य देण्याचा प्रयत्न यंदाच्या दीपोत्सवातून पूर्ण होईल, ही खात्री आहे. ज्ञान, भक्ती आणि कृती या तीन तत्वाची मानवी जीवनात सांगड घालणे गरजेचे आहे. समाजातील बदलाचे लोकमत द्योतक राहिला आहे, असे विचार प्रदीप दाते यांनी व्यक्त केले. ज्ञानवर्धक माहिती- लोमेश वऱ्हाडे४लोकमत वृत्तपत्राने समाजाच्या चौकटीत राहून नवीन विचार व दिशा देण्याचे कार्य केले आहे. दर्जेदार माहितीचे संकलन या दीपोत्सवात असल्याचे पुर्वानुमान वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या सारांशावरून लक्षात येते. बोलके मुखपृष्ठ - सुनील पाटणकर ४लोकमतने नवनवीन कल्पना अंंमलात आणताना त्या व्यवसायिक लाभ देणाऱ्या कशा ठरतील याचा नेहमी विचार केला आहे. लोकमतचे प्राबल्य सर्वत्र पाहायला मिळते. मुखपृष्ठावरील छायाचित्र अत्यंत बोलके असून जुने उघडून पहाल तरच नवीन दृष्टीस पडेल, असे सांगणारे आहे. समाजाला दिशा देणारा व कालसापेक्ष हा भाग या माध्यमातून जपला आहे.
‘लोकमत दीपोत्सवाचे’ थाटात विमोचन
By admin | Updated: November 6, 2015 03:17 IST