शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तथा वीज बिलातून मुक्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:43 IST

संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करा, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा, कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या,....

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : मोर्चा काढून दिले तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करा, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा, कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या, कपाशीवरील गुलाबी, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरित २० हजार रुपये एकरी मदत करा, नान एफएक्यू प्रतीच्या सोयाबीनची आधारभूत किंमत त्वरित जाहीर करून शासकीय खरेदी सुरू करा आदी मागण्या शेतकरी संघटनेने केल्या. यासाठी मोर्चा काढून तहसीदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी संघटनेच्यावतीने दीपाली मंगल कार्यालयात युवा परिषद घेण्यात आली. परिषदेला विदर्भवादी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष शैलजा देशपांडे, माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मधुसुदन हरणे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य चंद्रमणी भगत, गजानन निकम, निळकंठ घवघवे, ग्राहक पंचायतचे डॉ. नामदेव बेहरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल धनवट यांनी शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेगाव येथे होणाºया मेळाव्याला लाखोंच्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन केले. माजी आमदार सरोज काशीकर यांनी समुद्रपूर-हिंगणघाट हे एकेकाळी शेतकरी संघटनेचे बालेकिल्ले होते. आज मला ते सर्व कार्यकर्ते येथे दिसत आहे. यापुढील सर्व आंदोलने आणि दिलेले आदेश योग्यरित्या पाळले जातील, याचा मला विश्वास आहे. शेतकºयांना यापूढे शेतमालाचे योग्य भाव मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुट होऊन आपल्या मागण्या पदरात पाडता येतील, असे सांगितले. अ‍ॅड. चटप यांनी वेगळे विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकºयांचे भले होऊ शकत नाही. म्हणून शेतकºयांनी वेगळ्या विदर्भासाठी ताकदीने उभे राहावे, असे आवाहन केले.युवा परिषदेत जिल्हा महिला आघाडी शेतकरी संघटना अध्यक्षपदी जि.प. सदस्य ज्योती निकम, जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी अरविंद राऊत, उपाध्यक्ष युवा आघाडी पदी गणेश मुटे यांची नियुक्ती करण्यात आली. युवा परिषदेला जाताना नेत्यांना मोटार सायकल रॅलीने वाघेडा चौक ते दिपाली मंगल कार्यालयापर्यंत नेण्यात आले. सभेनंतर मोर्चाद्वारे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यात बाजारातील शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी कृषी मालाची ए, बी, सी अशा तीन ग्रेडची आधारभूत किंमत जाहीर करावी. मागील वर्षी जाहीर केलेली सोयाबीनची २०० रुपये प्रती क्विंटलचे अनुदान त्वरित वितरित करावी. वीज बिल थकबाकीपोटी कृषी पंपाजी जोडणी खंडित करू नये. वन्यप्राणी कायद्यात साप या प्राण्याचा समावेश करून सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणाºया नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनाचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी डॉ. हेमंत इसनकर, अजाब राऊत, जीवन गुरनुले, शेषराव तुळणकर, दिनेश निखाडे, केशव भोले, भाऊराव गाठे, प्रवीण महाजन, सचिन डोफे, तुकाराम थुटे, शंकर गुरनूले, चिंतामण राऊत, किसना शेंडे, हनुमंत राऊत, सुखदेव पाटील, विजय ठाकरे, पुंडलिक हुडे, अंकुश चेरे, सुनील हिवसे आदी उपस्थित होते.