शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबंध दृढ होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:06 IST

भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी बारमाही शेती करावी, असे प्रतिपादन सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरण आणि प्रकल्पाची पाहणी करताना चीनचे भारतातील मुंबई दुतावास कार्यालयातील अधिकारी (चॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी पिंपळगाव (भोसले) येथे केले.

ठळक मुद्देचांग झीयुन : सोलर सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी बारमाही शेती करावी, असे प्रतिपादन सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरण आणि प्रकल्पाची पाहणी करताना चीनचे भारतातील मुंबई दुतावास कार्यालयातील अधिकारी (चॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी पिंपळगाव (भोसले) येथे केले.चीनच्या सौर उर्जा प्रौद्योगिकी नावावर आणि सहयोगाने गरीबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमांतर्गत मुंबई आधारित सोलर सिंचन प्रकल्प चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय उर्जा कंपनी मर्यादितच्या पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर चीन सरकार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा हस्तांतरन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चीन सरकारचे मुंबई येथील दूतावासातील अधिकारी वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोंकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, वांग ली, अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शिला पवार, सरपंच जीवन राऊत उपस्थित होते. या प्रकल्पामध्ये शेतकºयांना समप्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वेगवेगळ्या स्थळी पाणी वितरणाच्या पाच नलिकेचे चेंबर बनविले. यात १० उपनलिका तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली.या सोलर सिंचन प्रकल्पासाठी चीन सरकारच्यावतीने १.६० कोटी तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३० लाखांचा खर्च करण्यात आला. या धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३० एच.पी. मोटरपंप बसविला आहे.यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभागाचे उपअभियंता साबळे, जिल्हा परिषदच्या लघुसिंचन विभागाचे उपअभियंता लांडगे, ससाने, पोलीस पाटील सतीश इंगोले व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी चीन प्रतिनिधींनी प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्पचीनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास ५० शेतकºयांना बारमाही सिंचनाचा लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील २२ हेक्टर शेती सोलर सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या ३० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.