शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींना रिअ‍ॅक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:51 IST

सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये देण्यात आलेल्या हिपेटायटीस बी या इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने लगेच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देएक विद्यार्थिनी गंभीर : श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये देण्यात आलेल्या हिपेटायटीस बी या इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने लगेच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील नऊ विद्यार्थिनींवर उपचार करुन सुटी देण्यात आली. तर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगच्या बी. एस. सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना शनिवारी दुपारच्या सुमारास परिचारिकांच्या हाताने इंजक्शन देण्यात आले. यावेळी जवळपास अठारा ते वीस विद्यार्थिनींना इंजक्शन दिल्यानंतर त्यापैकी दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. त्यांना डोके जड आल्यासारखे, गरगरल्या सारखे वाटू लागले. तर एक विद्यार्थिनी चक्कर येऊन खाली पडली. या सर्व दहाही विद्यार्थिनींना तात्काळ आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर नऊ विद्यार्थिनींची प्रकृती सुधारल्यावर सुटी देण्यात आली. यातील एक विद्यार्थिनी गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरु असून नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या मांडला आहे. यासंदर्भात नातेवाईक व विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर कसले दडपण तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना देतात इंजेक्शनसावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच येथील मेडिकल कॉलेज व नर्सिग कॉलेजचे विद्यार्थी हे रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी हिपेटायटीस बी हे इंजक्शन दिले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हिपेटायटीस बी इंजक्शन देण्यात आले. त्यात दहा विद्यार्थ्यांना रियॅक्शन आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एका विद्यार्थीनीला अ‍ॅनाफायलॅटीक्स रियॅक्शन आल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.- डॉ.चंद्रशेखर महाकाळकरमुख्य वैद्यकीय अधीक्षक, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय.

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य