दुर्लक्ष : कार्डाचे नूतनीकरण रखडलेआकोली : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून सेलू तहसील कार्यालयाला सहा महिन्यांपासून कोऱ्या शिधापत्रिकेचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या अर्जांचा येथील तहसील कार्यालयात ढीग साचला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना शासकीय सवलतीचा लाभ घेण्यास अडचण येत आहे.येथील काही शिधापत्रिका धारकांकडील कार्ड जीर्ण झाले आहे. तर काहींचे कार्ड हरविले आहे. त्यामुळे नवीन कार्डची मागणी केली होती. याकरिता सेलू तहसील कार्यालयात अर्ज करण्यात आला. मात्र सहा महिन्यांपासून कार्ड मिळालेले नाही. येथे २ हजार कार्डची गरज असल्याचे सांगण्यात येते. गत सहा महिन्यांत तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना चार वेळा पत्र लिहून कार्ड पुरविण्याबाबत कळविले आहे. पण अजूनही शिधापत्रिकांचा पुरवठा करण्यात आला नाही. लाभार्थी शिधापत्रिकाकरिता कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पण त्यांना कार्ड मिळत नाही. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कर्मचारीसुद्धा यापुढे हतबल झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी आहे.(वार्ताहर)