राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा सेवाग्रामात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:20+5:30

रविवार १९ जानेवारीला जुन्या वस्तीतील बौध्दविहार परिसरात सकाळी १० वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला सिने अभिनेंत्री अलका कुबल उपस्थित राहणार आहे. समारोप कार्यक्रमाला खा. विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खा.दत्ता मेघे आदी उपस्थित राहणार आहे. यात्रेत मोठे देसाई कोल्हापूर, राजकुमार धूत, डॉ.सुनीता महात्मे अ‍ॅड. प्रकाश रूपनवार यांच्यासह ३ हजार यात्रेकरू सहभागी आहे.

Rashtrasanta to Rashtrapati Gandhi entered the Sankalp Yatra Seva program | राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा सेवाग्रामात दाखल

राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा सेवाग्रामात दाखल

Next
ठळक मुद्देमोझरीवरून १०४ किमीचा केला प्रवास। रविवारी होणार यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम: राष्ट्रसंताची कर्मभूमी असलेल्या गुरूकुंज मोझरी येथून प्रारंभ झालेली राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा शनिवारी सायंकाळी सेवाग्राम येथे दाखल झाली. त्यानंतर यात्रेकरू सायंकाळच्या प्रार्थनेत सहभागी झाले. या यात्रेचे वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. राज्यसभा सदस्य खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या नेतृत्वात सदर यात्रा १०४ किमीचा प्रवास करून सेवाग्राम येथे सायंकाळी ५.४० वाजता पोहोचली. ४ दिवसांत या यात्रेने २० गावांना भेट देवून तेथील नागरिकांशी संवाद साधला. असे खा. महात्मे यांनी सांगितले. रविवार १९ जानेवारीला जुन्या वस्तीतील बौध्दविहार परिसरात सकाळी १० वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला सिने अभिनेंत्री अलका कुबल उपस्थित राहणार आहे. समारोप कार्यक्रमाला खा. विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खा.दत्ता मेघे आदी उपस्थित राहणार आहे. यात्रेत मोठे देसाई कोल्हापूर, राजकुमार धूत, डॉ.सुनीता महात्मे अ‍ॅड. प्रकाश रूपनवार यांच्यासह ३ हजार यात्रेकरू सहभागी आहे. शहरातील शांति नगर चौक येथे यात्रे चे भव्य स्वागत करण्यात आले. आंबेडकर पुतळा चौक येथे खासदार डॉ महात्मे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. पदयात्रा दिवसभर शहरातील विविध मार्गाने मार्गस्त होत सायंकाळी सेवाग्राम आश्रम येथे पोहोचली. यावेळी जितेंद्र बोरडे, प्रशांत लांबट, डॉ. सुनीता महात्मे, तुळसीदास आगरकर, राजकुमार मराठे, राकेश पाटील, प्रशांत निवांत, आशय बोबडे, निश्चल वरुडकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील तिगांव येथे शनिवार ला सकाळी खासदार महात्मे यांच्या नेतृत्वात पदयात्रेकडून श्रमदान करून ग्राम स्वच्छता करण्यात आले. तिगाव येथे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. ग्रामस्थांना स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्राम स्वच्छतेचा संदेश देऊन वृक्षारोपण करण्यात आले. खासदार महात्मे यांच्या हस्ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Rashtrasanta to Rashtrapati Gandhi entered the Sankalp Yatra Seva program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.