शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

धनोडी बहाद्दरपुरात आढळले दुर्मीळ झेंडूचे फूल

By admin | Updated: January 24, 2015 01:40 IST

झेंडू हे संपूर्ण देशात महत्त्वाचे फुलपीक. झेंडूची फुलांमध्ये आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू , क्रॅकर जॅक, गोल्डन जुबली, गोल्डन यलो जरसन जायंट, एम.डी.यू. आदी जाती प्रचलित आहे.

फनिंद्र रघाटाटे रोहणाझेंडू हे संपूर्ण देशात महत्त्वाचे फुलपीक. झेंडूची फुलांमध्ये आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू , क्रॅकर जॅक, गोल्डन जुबली, गोल्डन यलो जरसन जायंट, एम.डी.यू. आदी जाती प्रचलित आहे. या सर्व फुलांचे आयुष्य किमान दोन ते तीन दिवसांचे. वर्धा जिल्ह्यातील धनोडी बहाद्दरपूर येथे फुल तोडल्यानंतरही १५ दिवस टवटवित राहणारा दुर्मीळ झेंडू आढळला आहे. आपल्या परसबागेत श्याम गायकवाड यांनी ही लागवड केली आहे. सृष्टीवरील प्रत्येक सजीवाला मर्यादेपर्यंत आयुष्य असते. झाडे आणि फुलेही त्यातून सुटली नाहीत. झाडांचे आयुष्यमान शेकडो वर्षांचे असले तरी, झाडांना येणाऱ्या फुलांचे आयुष्यमान अतिशय अल्प असते. त्यातच फुले ही श्रद्धेय असल्याने मानव श्रद्धेपोटी फुलांना तोडून फुलांना मिळालेले आयुष्यही हिरावतो. साधारणत: तोडलेली फुले ही एका दिवसातच कोमेजून जातात. व्यवसायिक फुले तोडल्यानंतर किमान दोन दिवस ताजे राहतात. गायकवाड यांनी लागवड केलेल्या झेंडूचे फुल तोडल्यानंतरही १५ दिवस टवटवित राहत असल्याने, व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंददायी वार्ता आहे. फिक्या पिवळ्या रंगाचे हे फुल आहे. एका झाडाला जवळपास ५० ते ६० फुले येतात. गत तीन वर्षांपासून त्यांच्या परसबागेत या झेंडूच्या फुलांचे दोन झाडं आहेत. या दुर्मीळ फुलांची माहिती परिसरातील फुलशेती करणारे शेतकरी व्यापारी यांना मिळाल्याने कुतूहल व आकर्षणापोटी माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे नियमित येत आहे. प्रसादात आलेल्या फुलाच्या बीजापासून झाडश्याम गायकवाड आष्टा येथील भिकाजी महाराजांच्या आश्रमात दर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांना प्रसादाच्या स्वरुपात हे फुल मिळाले. या फुलांचे बीज त्यांनी संग्रही करून ठेवले, त्यानंतर मृग नक्षत्रात त्याची लागवड घराच्या परसबागेत केली. त्याला शेणखत दिले. संगोपण केले. मार्गशिष महिन्यात त्याला फुले आली. कृषी तज्ज्ञ व अभ्यासकांनी या झाडांची पाहणी केल्यानंतर या झाडांना मिळालेल्या वातावरणानुसार हा काश्मिरी झेंडू असल्याचा तर्क त्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा हा झेंडू भिकाजी महाराजांनी प्रसाद रुपात दिल्यामुळे याची शेती करण्याचा निर्णय श्याम गायकवाड यांनी घेतला आहे.