शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:40 IST

जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देमहिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.जिल्ह्यातील रापमच्या अनेक बसेसच्या खिडकींच्या काचा तुटलेल्या असून काही बसेस अर्ध्यातच दम टाकत असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर काही बसेसचे आसन फाटलेले आहेत. त्यामुळे नेहमीच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना योग्य प्रवासी सेवा देता यावी, यासाठी तत्कालीन विभाग नियंत्रक गव्हाळे यांच्या कार्यकाळात विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर रापमने सौजन्य नमस्कार उपक्रम राबविला. परंतु, तोही प्रवाशांना रापमच्या बसेसकडे आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा असर करू शकला नाही.जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात एकूण ३२० बसेस असून महिन्याकाठी या गाड्यांना ३६९ टायर लावल्या जातात. यापैकी २५९ टायर रिमोल्ड केलेले असतात. तर केवळ १२० नवीन टायरची खरेदी असल्याचे सांगण्यात आले.पाच आगारात एकूण ३२० बस गाड्याजिल्ह्यातील रापमच्या पाच आगारात ३२० बसेस असून त्या बसेस दररोज प्रवाशांना सेवा देण्यासाठी सोडण्याचे नियोजन केले जाते. परंतु, मोठ्या प्रमाणात रिमोल्ड टायरचा वापर होत असल्याने बहूदा या धावणाऱ्या रापमच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासातच पंक्चर होतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.वर्षाला ४,४२८ टायरची मागणीजिल्ह्यातील पाचही आगारातील एकूण ३२० बस गाड्यांसाठी प्रत्येक महिन्याला ३६९ तर वर्षाकाठी ४ हजार ४२८ टायरची मागणी राहते. परंतु, प्रत्येक वर्षी केवळ १ हजार ४४० नवीन टायरची खरेदी केली जात असल्याचे वास्तव आहे. नवीन टायरची खरेदी मागणीच्या तुलनेत नाममात्र होत असल्याने रिमोल्ड टायरचा वापर करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.आमच्या आगारात उत्कृष्ट बसेस आहेत. मागणीनुसार आम्ही चांगल्या ग्रेडच्या रिमोल्ड टायरचा बसच्या मागील चाकाकरिता वापर करतो. या विषयावर आमचा आगार विशेष लक्ष देते.- अतुल डाहाके, विभागीय भंडार अधिकारी, वर्धा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ