शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कासवगतीने भरून निघतेय जिल्ह्यातील पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणात का होईना; पण  जिल्ह्यातील आठही तालुक्यात पाऊस होत असल्याने कासवगतीनेच जिल्ह्यात पावसाची तूट भरून निघत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एरवी वर्धा जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेरपर्यंत सुमारे ६६७०.८४ मि.मी. पाऊस पडलो, पण यंदा आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणात का होईना; पण  जिल्ह्यातील आठही तालुक्यात पाऊस होत असल्याने कासवगतीनेच जिल्ह्यात पावसाची तूट भरून निघत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. मागील २४ तासात जिल्ह्यातील सात तालुक्यात १०९.२१ मि.मी. पाऊस झाला असून वर्धा १४.४० मि.मी., सेलू ६.४० मि.मी., देवळी १२.८५ मि.मी., हिंगणघाट २८.४५ मि.मी., समुद्रपूर ३५.१२ मि.मी., आर्वी ८.९३ मि.मी. तर आष्टी ३.०६ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत पडतो जिल्ह्यात ६६७०.८४ मि.मी. पाऊस- जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे ६६७०.८४ मि.मी. पाऊस पडतो. एरवी सप्टेंबर अखेरपर्यंत वर्धा तालुक्यात ८२१.५२ मि.मी., सेलू ९१०.५० मि.मी., देवळी ८२८.३० मि.मी., हिंगणघाट ९३४.४७ मि.मी., समुद्रपूर ९२७.९० मि.मी., आर्वी ८३८.३५ मि.मी., आष्टी ७४२.५० मि.मी. तर कारंजा तालुक्यात ६६७.३० मि.मी. पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी कोसळला होता १९३९.१५ मि.मी. पाऊस- जिल्ह्यात मागील वर्षी ३ जुलै या दिवसापर्यंत एकूण १९३९.१५ मि.मी. पाऊस पडला हाेता. मागील वर्षी ३ जुलैपर्यंत वर्धा तालुक्यात २०१.७८ मि.मी., सेलू २१३.६० मि.मी., देवळी ३५२.२२ मि.मी., हिंगणघाट २६८.६५ मि.मी., समुद्रपूर २१६.३८ मि.मी., आर्वी २५८.७२ मि.मी., आष्टी २२२.०८ मि.मी. तर कारंजा तालुक्यात २०५.७२ मि.मी. पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Rainपाऊस