लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : भरधाव आॅटो अचानक अनियंत्रित होत पलटी झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून ही घटना आर्वी मार्गावरील सुकळी (बाई) शिवारात शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसी कारवाईच्या धाकाने आॅटोचालकाने जखमी प्रवाशांना वाहन सरळ करून त्यात बसवून घटनास्थळावरून पळ काढला, हे विशेष.प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ३२ बी. ६८७९ क्रमांकाचा आॅटो वर्धा-आर्वी मार्गावरील सुकळी (बाई) शिवारातील वळण रस्त्यावर आला असता अनियंत्रित होत उलटला. यात आॅटोमधील चार प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी दोघांना चांगलीच दुखापत झाली होती. अपघात होताच वाहन सरळ करून जखमींना वाहनात कोंबून वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे या आॅटोतून दारूची वाहतूक केली जात असल्याचे काही पुरावे मात्र घटनास्थळी राहिल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.दारू भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घटनास्थळीचअपघात झाल्यानंतर मोठ्या हुशारीने आॅटोचालकाने तातडीने जखमींना वाहनात बसवून घटनास्थळावरून पोबारा केला. परंतु, अपघातादरम्यान आॅटोत असलेल्या गावठी दारू असलेल्या प्लास्टिक पिशव्या घटनास्थळीच अस्ताव्यस्थ पडून होत्या. त्यामुळे उपस्थितांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
भरधाव आॅटो उलटला; चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:30 IST
भरधाव आॅटो अचानक अनियंत्रित होत पलटी झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून ही घटना आर्वी मार्गावरील सुकळी (बाई) शिवारात शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसी कारवाईच्या धाकाने आॅटोचालकाने जखमी प्रवाशांना वाहन सरळ करून त्यात बसवून घटनास्थळावरून पळ काढला, हे विशेष.
भरधाव आॅटो उलटला; चौघे जखमी
ठळक मुद्देसुकळी (बाई) शिवारातील घटना : कारवाईच्या धाकाने काढला पळ