शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

‘त्या’ पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 3, 2016 02:03 IST

पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये चौथ्यांदा झालेल्या स्फोटामुळे हादरलेल्या परिसरातील त्या पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

सर्वेक्षण व मोजणी झाली : प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबितचपराग मगर वर्धापुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये चौथ्यांदा झालेल्या स्फोटामुळे हादरलेल्या परिसरातील त्या पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दारूगोळा भांडाराच्या कक्षा रुंदावणार होत्या. यासाठी काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण व जमिनीची मोजणी झाली. तत्सम आखणी करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया होत असल्याने नाचणगाव, पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, मुरदगाव आणि येसगाव येथील नागरिकांत लवकरच आपल्याला राहते घर सोडावे लागणार, अशी भावनाही निर्माण झाली होती; पण घोडे कुठे अडले कळलेच नाही. अद्यापही या गावांचे पुनर्वसन न झाल्याने दहशतीत जगावे लागत आहे. यामुळे पाचही गावांचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. २८ किमीच्या विस्तीर्ण जागत असलेल्या पुलगाव दारूगोळा भांडारालगत वस्ती असू नये, असे नियम आहे. तशी दाट वस्तीही दारूगोळा भांडाराच्या आसपास नाही; पण लगतची गावे कायम आहेत. दारूगोळा भांडाराच्या सिमेपासून काही अंतरावर पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी आणि मुरदगाव ही गावे आहेत. पुलगाव दारूगोळा भांडारामध्ये नेहमी स्फोट होत असतात. पूर्वी मुदत संपलेले बॉम्ब खंदकामध्ये फोडले जात होते. यात होणाऱ्या स्फोटामुळे परिसरातील गवताला आगीही लागत होत्या. यामुळे जीविताला धोका होऊ नये म्हणून पाचही गावे रिकामी करावी लागत होती. या गावांतील नागरिकांना देवळी येथील धर्मशाळेत आणि नाचणगाव येथील मंदिरामध्ये थांबविले जात होते. दारूगोळा भांडारातील आग नियंत्रणात आली की, पुन्हा ग्रामस्थ आपापल्या घरी परतत होते. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार सुरू आहे. यावर तोडगा म्हणून पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, मुरदगाव व येसगाव ही गावे ताब्यात घेत नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी समोर आली होती. शिवाय दारूगोळा भांडाराचे विस्तारीकरणही प्रस्तावित होते. यामुळे पाचही गावांचे पुनर्वसन होणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. याबाबत सर्वेक्षण, मोजणीही करण्यात आली; पण आठ-दहा वर्षांचा काळ लोटला असताना अद्यापही पुनर्वसनाची प्रक्रिया पूढे सरकली नाही. पुलगाव दारूगोळा भांडाराला लागून असलेल्या पाचही गावांतील जमिनीचे अधिग्रहण करून नागरिकांना मोबदला देणे आणि पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देणे, ही बाब प्रस्तावित होती; पण काळ लोटला असताना केंद्र शासनाकडून कुठलीही भूमिका घेण्यात आली नाही. यामुळे आजही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत आहे. आता काल-परवा झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता तर पिपरी (खराबे) या गावातील नागरिकही आमच्या जमिनी घ्या आणि गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी करू लागले आहेत. आगरगाव, नागझरी, मुरदगाव व येसगाव येथील नागरिकांनीही जमिनी अधिग्रहित करून पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीचा आता तरी विचार होणार की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये सोमवारी रात्री स्फोट झाला. याचा परिसरातील गावांना जबर हादरा बसला. या स्फोटाने लागलेली आग विझली असली तरी समाजातील धग कायम आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचा टाहो, मृतदेह न मिळणे, ओळख न पटणे ही एक बाजू आणि अर्ध्या रात्री जीवाच्या आकांताने ग्रामस्थांची होणारी पळापळ, ही दुसरी बाजू. दोन्ही पैलू मन अस्वस्थ करणारेच आहेत.